Flower Farming
Flower Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Farming : कमी पाण्यात उत्पादन मिळविण्यासाठी धडपड सुरू

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Farmer Management :

शेतकरी नियोजन

पीक : फुलशेती

शेतकऱ्याचे नाव : गणेश सुरेश कोळपे

गाव : यवत (भुलेश्‍वर नगर), दौंड, जि. पुणे

एकूण शेती : १० एकर

फळ पिके : सीताफळ ६ एकर, मेथी अर्धा एकर

फुलपिके : शेवंती दीड एकर, अर्धा एकर मोगरा.

फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकेक

सण, उत्सव महत्त्वाचा असतो. नुकताच गुढी पाडवा झाला. आता एप्रिल मेमधील लग्नसराईचा हंगाम पकडण्यासाठी प्रयत्न केले जातात. या काळात पांढऱ्या, पिवळ्या शेवंतीला चांगली मागणी राहते. यवत (भुलेश्‍वर नगर) येथील गणेश कोळपे यांनी या वर्षी दीड एकरावर विविध प्रकारच्या वाणांची लागवड जानेवारीमध्येच केली आहे. त्यातील सेंट व्हाइट या वाणाच्या फुलांची काढणी आता सुरू होत आहे.

पिकांचे नियोजन

सध्या उन्हाळी वातावरणामध्ये पाण्याचा मागणी वाढली असून, दोन विहिरी असल्या तरी तुलनेत पाणी कमी पडू लागले आहे. ही तशी दरवर्षीची बाब झाली आहे. त्यामुळे प्रामुख्याने सीताफळासारखे कमी पाणी लागणारी फळबाग सहा एकरांवर घेतली आहे.

या बागेमध्ये मेथी अर्धा एकर, मोगरा अर्धा एकर घेतला आहे. दरवर्षी पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या शेवंतीची लागवड फेब्रुवारी, मे, जुलै, अशा तीन महिन्यांत लागवडीचे करतात. लागवडीनंतर ४५ दिवसांनी फुले काढणीस येऊन पुढे दोन ते अडीच महिने उत्पादन मिळत राहते.

रोपवाटिका

या वर्षी डिसेंबरमध्ये रोपवाटिकेतून रोपे तयार करून घेतली. वीस ते पंचवीस दिवसांची लागवडयोग्य रोपे सरीवर लावली. एकरी सुमारे दहा हजार रोपे लागतात. त्यानंतर ठिबकद्वारे पाणी दिले जाते.

फुलशेतीचे व्यवस्थापन

लागवडीनंतर रोग, किडीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवले जाते. त्यात प्रामुख्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो. त्याला रोखण्यासाठी लागवडीनंतर एक महिन्यानंतर प्रतिबंधात्मक फवारणीचे नियोजन केले. फुटवे अधिक होण्यासाठी फवारणी केली जाते. सव्वा महिन्यानंतर रासायनिक खते दिली जातात.

सणासुदीला चांगली मागणी

सण, उत्सव आणि लग्नसराईमध्ये फुलांना प्रति किलो १०० ते १५० रुपये असा दर मिळतो. अन्य काळात तो ५० ते ६० रुपये प्रति किलो असा राहतो. काढणी सुरू झाल्यानंतर प्रथम पाच ते दहा किलोपासून काढणी होत ती हळूहळू वाढत जाते.

एकरी चार ते पाच टनांपर्यंत उत्पादन मिळते. प्रामुख्याने पुणे बाजार समितीमध्ये फुले पाठवली जातात. चांगला दर मिळाल्यास एकरी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

मागील पंधरा दिवसांतील कामकाज

शेवंतीमध्ये सेंट व्हाइट, भाग्यश्री (पांढरी), पौर्णिमा या वाणांची लागवड.

एकरी चार ट्रेलर शेणखत वापरून रोटाव्हेटर मारल्यानंतर गादीवाफे तयार केले.

चार फुटी गादीवाफ्यावर सव्वा फुटावर एक रोप या प्रमाणे लागवड केली.

लागवडीनंतर पाच दिवसांनी बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲसिड यांची आळवणी केली.

दहा दिवसांनी रासायनिक खते सुरू केली. त्यातील प्रथम १९:१९:१९ व २८:२८:०० यांचा वापर.

आवश्यकतेनुसार रोग, किडीसाठी कीडनाशकांची फवारणी.

पुढे कळ्यांवर येताना निंबोळी पेंड, १०:२६:२६, १८:४६:०० या खतांचा वापर.

वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे प्रमाण वाढवले आहे.

पुढील पंधरादिवसांचे नियोजन

सध्या पीक काढणीच्या अवस्थेत आहे. काढणी वेळी फुलांचा आकार मोठा राहण्यासाठी सेंद्रिय खते महत्त्वाची राहतात. त्यामुळे केवळ रासायनिक खतांवर अवलंबून राहण्यापेक्षा लागवडीपासून सेंद्रिय खतांचा वापर केला जातो.

उत्पादन सुरू झाल्यानंतर ५० किलो डाग तयार करून पुणे बाजारामध्ये पाठविले जाईल.

या वर्षी ६ टनांचे उत्पादन मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गणेश कोळपे, ८३८०००७७९९, (शब्दांकन ः संदीप नवले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT