Fertilizer Management : खरिपासाठी ८५ हजार ४५१ टन रासायनिक खते मंजूर

Agriculture Fertilizer : हिंगोली जिल्ह्याला यावर्षीच्या (२०२४) खरिप हंगामासाठी कृषी विभाने ८२ हजार ५१ टन खतांची मागणी केलेली असतांना कृषी आयुक्तलयाने विविध ग्रेडच्या ८५ हजार ४५१ टन रासायनिक खते मंजूर केली आहेत.
Agriculture Fertilizer
Agriculture Fertilizer Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्याला यावर्षीच्या (२०२४) खरिप हंगामासाठी कृषी विभाने ८२ हजार ५१ टन खतांची मागणी केलेली असतांना कृषी आयुक्तलयाने विविध ग्रेडच्या ८५ हजार ४५१ टन रासायनिक खते मंजूर केली आहेत. तसेच नॅनो युरियाच्या १७ हजार ६०० व नॅनो डिएपी २ हजार बॉटल्स मंजूर आहेत. यंदाच्या मागणीच्या तुलनेत ३ हजार ४०० टन जास्त तर गतवर्षीच्या ७७ हजार ५६० टन खतांच्या तुलनेत ७ हजार ८९१ टन एवढा जास्त खतसाठा मंजूर करण्यात आला आहे.

Agriculture Fertilizer
Fertilizer Demand : खरीप हंगामासाठी १८ हजार ५६७ टन खतांची मागणी

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ३ लाख ११ हजार ४०४ हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्याचा सरासरी खतांचा वापर ८१ हजार ५६९ टन आहे. त्यानुसार ८२ हजार ५१ टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविली होती.परंतु जिल्ह्याला विविध ग्रेडच्या ८५ हजार ४५१ टन रासायनिक खतांचा साठा मंजुर करण्यात आला आहे.

त्यात युरिया १६ हजार २०० टन, डिएपी १५ हजार ८०० टन,पोटॅश- एमओपी ३ हजार ३०० टन, सुपर फॉस्फेट १६ हजार १०१ टन, अमोनियम सल्फेट ५० टन, संयुक्त खते -एनपीके ३४ हजार टन या खतांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यासाठी ५ हजार ९९ टन खत साठा मंजूर झाला आहे. त्यापैकी आजवर २ हजार ५९० टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.

Agriculture Fertilizer
Fertilizer Sanction : नांदेडला दोन लाख टन खतांचे आवंटन मंजूर

त्यात युरिया १ हजार ३०० टन, डिएपी ३९० टन, एनपीके ९०० टन या खतांचा समावेश आहे. मार्च अखेर एकूण ३१ हजार १४६ टन खते शिल्लक होती.त्यात युरिया ९ हजार ५६३ टन, डिएपी २ हजार १२३ टन, एमओपी-पोटॅश ७३० टन, संयुक्त खते-एनपीके ११ हजार ७०० टन, सुपर फॉस्फेट ७ हजार ६ टन, अमोनियम सल्फेट २२.३ टन खते आहेत. मार्च अखेरची शिल्लक व एप्रिल मधील पुरवठा मिळून एकूण मिळून एकूण ३३ हजार ७३६ टन खतांचा साठा शिल्लक होता, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली जिल्हा तुलनात्मक खरिप खतसाठा मंजूर स्थिती (टनामध्ये)

खताचा प्रकार २०२३ २०२४

युरिया १६१५१ १६२००

सुपर फॉस्फेट १५४५१ १६१०१

पोटॅश ४३०० ३३००

डिएपी १२९३९ १५८००

एनपिके २८७१९ ३४०००

अमोनियम सल्फेट ५० ५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com