Flower Farming : भातशेतीला पॉलिहाउसमधील गुलाबशेतीची जोड

Article by Sandip Navle : पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले येथील आमले कुटुंबाने तीन वर्षांपासून भातशेतीला दीड एकर पॉलिहाउसमधील गुलाबशेतीची जोड दिली आहे.
Flower Farming
Flower FarmingAgrowon
Published on
Updated on

संदीप नवले

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाऊस मोट्या प्रमाणात पडतो. भात हे या भागाचे मुख्य पीक आहे. खरिपात भात घेतल्यानंतर रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू व त्यानंतर उन्हाळ्यात शेत खाली ठेवून पुन्हा पुढील हंगामात भातासाठी शेत तयार केले जाते. आर्थिक बाजू भक्कम होण्याच्या दृष्टीने केवळ भात पिकावर अवलंबून राहाता येणे शक्य नसते.

अशावेळी या भागासाठी अनुकूल व व्यावसायिक अशा पिकांकडे वळण्याचा मावळ भागातील शेतकऱ्यांचा कल असतो. त्यातूनच या भागात पॉलिहाउसेस, त्यात आधुनिक तंत्रज्ञानाने गुलाबशेती असे कल्चर अलीकडील वर्षांत चांगल्या प्रकारे विकसित झाले आहे. त्यातून निर्यातदार कंपन्यांनाही व्हॅलेंटाइन डे किंवा वर्षातील अन्य सणासुदीत मोठ्या प्रमाणात फुले उपलब्ध होऊ लागली आहेत.        

आमले कुटुंबाची गुलाब शेती

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी मळवंडी ठुले येथे प्रदीप, शाहिदास आणि रूपेश या तीन भावांचे १० सदस्यांचे कुटुंब आहे. त्यांची १२ एकर शेती आहे. भातशेतीला व्यावसायिक जोड म्हणून ते सुमारे तीन वर्षांपूर्वी पॉलिहाउस शेतीकडे वळले.

लागवडीखाली दीड एकर तर लागवडी खाली न आलेले एक एकर असे एकूण अडीच एकरांवर त्यांचे पॉलिहाउस आहे. शेतीला सुरुवात करण्यापूर्वी शाहिदास यांनी फुलांच्या बाजारपेठेचा अभ्यास केला.

यात कोणत्या वाणांना, रंगांना सर्वाधिक मागणी आणि दर मिळतो याची माहिती घेतली. त्यानुसार व संतोष ठुले यांच्या मार्गदर्शनातून लागवड तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात चांगले उत्पादन मिळून पुणे आणि मुंबई येथील बाजारपेठेत विक्री यशस्वी केली. जय गणेश प्लॉवर असे त्यांनी फार्मचे नामकरण केले आहे.

Flower Farming
Flower Farming : फुलशेतीतून मिळाला शाश्वत उत्पन्नाचा मार्ग

व्यवस्थापनातील बाबी

डच गुलाबाच्या लाल, पिवळ्या, गुलाबी, पांढऱ्या छटा असलेल्या सहा रंगांचे गुलाब घेतले आहेत. पूर्वीच्या पॉलिहाउसमध्ये गादीवाफ्यावर (बेड) सलग पद्धतीने लागवड होती. नव्या लागवडीतच झिगझॅग पद्धतीचा वापर केला आहे. या भागातील अनेक गुलाब उत्पादक निविष्ठांची एकाच वेळी खरेदी करतात. त्यातून खर्चात मोठी बचत होते.

आमले यांना वर्षभरातील एक दोन महिने वगळल्यास दीड एकरांत प्रति महिना एक लाखांपर्यंत फुलांचे उत्पादन होते. ए, बी अशा ग्रेड तयार केल्यानंतर निर्यातीसाठी १० फुलांचा, तर स्थानिक विक्रीसाठी २० फुलांचाबंच तयार केला जातो. दीड एकरासाठी आमले यांना सुमारे एक कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागली आहे.

Flower Farming
Flower Farming : शेवंती फुलशेतीत यवतने मिळवली ओळख

त्यातील २० लाख स्वतःकडील गुंतवून उर्वरित रक्कम बँकेकडून घ्यावी लागली आहे. ‘प्री कूलिंग’ व ‘कोल्ड स्टोअरेज’ (शीतगृह) या सुविधाही उभारल्या आहेत. या यंत्रणेत सुमारे दोन लाख फुले ठेवण्याची क्षमता आहे. ज्या वेळी बाजारात दर कमी असतात त्या वेळी या यंत्रणेचा फायदा होतो. दर वाढतात त्यावेळी येथे साठवणूक केलेल्या फुलांची विक्री करता येते. चार टन क्षमतेच्या प्रति यंत्रणेमागे दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीची गरज असते.

गुलाब शेतीत खर्च प्रति फूल किमान २.५० ते ३ रुपये खर्च येतो. वर्षभराचा विचार करता ३५ ते ४० टक्यांपर्यत नफा मिळतो. या शेतीतून परिसरातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या आमले यांच्या शेतीत १० ते १५ मजूर काम करतात.

कृषी सहायक विकास गोसावी, तालुका कृषी अधिकारी दत्ता पडवळ यांचे या शेतीतील अनुदानासाठी सहकार्य झाले  आहे. पूर्वी भात, भाजीपाला आदींच्या शेतीतून वर्षाकाठी एकरी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळायचे. मात्र गुलाब शेतीतून दरवर्षी काही लाख रुपयांची उलाढाल करणे आमले कुटुंबाला शक्य झाले आहे.    

‘व्हॅलेंटाइन डे’साठी तयारी

१४ फेब्रुवारी या ‘व्हॅलेंटाइन डे’ला निर्यात साधण्यासाठी करण्यासाठी काही महिने आधीपासूनच शेतकरी तयारी करीत असतात. सुमारे २५ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात गुलाबांची निर्यात होते.यात मुख्यतः नेदरलॅंड देशाचा समावेश आहे.

निर्यातदारांमार्फत अन्य काही देशांनाही फुले पाठवली जातात. देशांतर्गत दिल्ली, गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम राज्यांसह मुंबई, वाराणसी, बडोदा आदी ठिकाणी गुलाब पाठविण्यात येतात. निर्यातीसाठी प्रति फूल १३ ते १४, तर स्थानिकसाठी ८ ते ९ रुपये दर मिळतो.  

शाहिदास आमले    ७९७२१२००१८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com