Flower Farming : नियमित कामातून मिळवतो जरबेराचे अधिक उत्पादन

Flower Management : पुरंदर तालुक्यातील दिवे येथे सोमनाथ झेंडे कुटुंबीयांची तीन एकर शेती आहे. सचिन आणि राहुल अशी दोघे भावंडे शेतीकडे लक्ष देतात.
Flower Farming
Flower FarmingAgrowon

शेतकरी नियोजन

पीक : जरबेरा फुलशेती

शेतकरी : सचिन सोमनाथ झेंडे

गाव : दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे

एकूण क्षेत्र : ३ एकर

पॉलिहाउस : ३० गुंठे

पुरंदर तालुक्यातील दिवे येथे सोमनाथ झेंडे कुटुंबीयांची तीन एकर शेती आहे. सचिन आणि राहुल अशी दोघे भावंडे शेतीकडे लक्ष देतात. त्यात ३० गुंठे पॉलिहाउस असून, त्यामध्ये प्रामुख्याने सचिन हे जरबेरा फुलशेती शेती करतात. सोबतच अंजीर आणि सीताफळाची फळबागही आहे. अन्य सर्व शेतीच्या तुलनेत पॉलिहाउसमधून कमी कष्टात अधिक उत्पन्न मिळते.

खत पाण्याचे व्यवस्थापन :

सध्या दररोज ठिबक सिंचनाद्वारे दहा मिनिटे पाणी सोडले जाते. सोबत एक दिवसाआड विद्राव्य खते दिली जातात. वातावरणानुसार बेडमध्ये वाफसा कायम ठेवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे पिकांकडून खतांचे चांगल्या प्रकारे शोषण होते. दर चार ते पाच महिन्यांतून एकदा बेसल डोस दिला जातो. त्यात रासायनिक खते, सेंद्रिय खते, मायक्रोन्यूट्रीयन्स इत्यादी खताचा डोस दिला जातो.

Flower Farming
Flower Farming : भातशेतीला पॉलिहाउसमधील गुलाबशेतीची जोड

आवश्यकतेनुसार फवारण्या :

पॉलिहाउसमधील जरबेरामध्ये लाल कोळी, तुडतुडे, नागअळी, भुरी, करपा अशा कीड-रोगाचा प्रादुर्भाव होतो. वातावरणानुसार रोग किडींसाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे खर्चात बऱ्यापैकी बचत होते. आठवड्यातून कीटकनाशक, बुरशीनाशक आणि अन्नद्रव्ये अशा एखाद्या फवारणीचे नियोजन असते.

उत्पादन :

जरबेरा लागवडीनंतर तीन महिन्यांनी उत्पादन सुरू होते. पुढे अडीच ते तीन वर्षे चांगल्या प्रकारे उत्पादन देते. त्यामुळे त्याचे गादीवाफे व सेंद्रिय खतांचे नियोजन सुरुवातीलाच चांगले करावे लागते. उत्पादन सुरू झाल्यानंतर दिवसाआड याची फुले काढणी केली जाते.

त्यानंतर त्यांना प्लॅस्टिक पिशव्या लावून दहा फुलांची एक या प्रमाणे गड्ड्या बांधल्या जाता. तीस गुंठे क्षेत्रात दिवसाआड साधारण ३५० ते ४५० गड्ड्या सापडतात. लग्नसराई, सणांच्या कालावधीमध्ये फुलांना अधिक जास्त मागणी असते. या काळात फुलांचे दरही वाढतात. साधारण एक गड्डी ३० ते ५० रुपयांपर्यंत जाते.

Flower Farming
Rose Flower Demand : ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे गुलाब फुलांना उठाव

गेल्या महिन्यात केलेली कामे

गेल्या १५ दिवसांत जरबेराची खराब पाने काढून टाकली.

दुपारी उन्हे जास्त असल्यामुळे दर दोन दिवसांनी शॉवरने पाणी मारण्यावर भर दिला.

पाला काढल्यानंतर बेडमध्ये सेंद्रिय व रासायनिक खतांचा एक डोस भरून घेतला.

पुढील १५ दिवसांतील नियोजन :

पुढील महिन्यात आतापेक्षा जास्त उन्हाळा वाढू शकतो. कोरड्या हवामानामुळे पॉलिहाउसमधील आर्द्रता ६० टक्क्यांपेक्षा अधिक ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. ठिबक सिंचन आणि फॉगरचे प्रमाण वाढवावे लागते. त्यावर लक्ष ठेवून नियोजन केले जाईल.

वाढत्या तापमानानुसार फुलांचे प्रमाण वाढते. त्यानुसार खतांचे नियोजन करावे लागते.

फुलांची काढणी आणि वेळेवर पॅकिंगचे कामही वाढते.

सचिन झेंडे, ९५५२६२८७९७ (शब्दांकन ः संदीप नवले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com