Parbhani News: जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या ७० हजार ५३१ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ५८ हजार २४ बाधित शेतकऱ्यांना २ ते ३ हेक्टरच्या मर्यादेत आर्थिक मदत देण्यासाठी ६० कोटी ७३ लाख ७३ हजार रुपये निधी वितरणास महसूल व वनविभागातर्फे सोमवारी (ता.२०) काढण्यात आलेल्या शासन निर्णयाव्दारे मंजुरी देण्यात आली..परभणी जिल्ह्यात २ ते ३ हेक्टरपर्यंत ६९७ गावातील ३९ हजार ४५२ शेतकऱ्यांचे ५८ हजार ३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात ५७ हजार ९६२ हेक्टरवरील जिरायती पिके तसेच ७१.२६ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले. जिरायती पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी ८ हजार ५०० रुपयेनुसार तर फळपिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी २२ हजार ५०० रुपयेनुसार मदत दिली जाईल. त्यासाठी ४९ कोटी ४२ लाख ९० हजार रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली..Ativrushti Madat: शेतकऱ्यांना ६४८ कोटी रुपये मिळणार; २३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर .हिंगोली जिल्ह्यातील २ ते ३ हेक्टरच्या मर्यादेत १८ हजार ५७२ शेतकऱ्यांचे १२ हजार ४९८ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी ११ कोटी ३० लाख ८३ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर देण्यात येणाऱ्या मदतीच्या अनुषंगाने २ ते ३ हेक्टरच्या मर्यादेतील (वाढीव १ हेक्टर) मदत वितरित करताना द्विरुक्ती होणार नाही यांची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी.एका हंगामात एक एक वेळेस या प्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी असे निर्देश देण्यात आले आहेत..Ativrushti Madat GR : २३ जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने निधी वाटपास दिली मान्यता, शासन निर्णय प्रसिद्ध.परभणी जिल्हा २ ते ३ हेक्टर मर्यादेत पीक नुकसान मंजूर निधी (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र मंजूर निधीपरभणी १०२५६ २१७६३ १८ कोटी ५५ लाख ६१ हजार रुपयेजिंतूर ३६७० ३०२० २ कोटी ५६ लाख ७० हजार रुपयेसेलू ५९७५ ९७५७ ८ कोटी २९ लाख ८६ हजार रुपयेमानवत १९८९ १७५० १ कोटी ४८ लाख ७५ हजार रुपयेपाथरी ३५५६ ८०२ ६८ लाख १७ हजार रुपयेसोनपेठ ३११७ १७४६ १ कोटी ४८ लाख ४१ हजार रुपयेगंगाखेड ४३७३ ११४८१ ९ कोटी ७६ लाख ३० हजार रुपयेपालम २७७० ३४८० २ कोटी ९५ लाख ८० हजार रुपयेपूर्णा ३७४६ ४२३४ ३ कोटी ६३ लाख २७ हजार रुपये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.