Sugar Production Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : सातारा जिल्ह्यात साखरेची ५८ लाख क्विंटल निर्मिती

Sugarcane Season : सातारा जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी अडीच महिन्यांत तब्बल ५९ लाख ९९ हजार ५४२ टन उसाचे गाळप करून ५८ लाख ५० हजार ५३६ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी अडीच महिन्यांत तब्बल ५९ लाख ९९ हजार ५४२ टन उसाचे गाळप करून ५८ लाख ५० हजार ५३६ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. गाळपाचा वेग वाढला असला तरी सरासरी उताऱ्यावर परिणाम झाला असून, सरासरी ९.७५ टक्केच उतारा पडत आहे. तर खासगी कारखाने यावर्षी साखर उताऱ्यात मागे पडल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन वर्षांच्या ऊस गाळपाचा आढावा पाहिल्यास खासगी कारखाने मोठ्या प्रमाणात गाळप करून उताराही चांगला मिळत होता; पण यावर्षी खासगी कारखान्यांना कमी प्रमाणात उतारा मिळू लागला आहे. सातपैकी ग्रीन पॉवर शुगर आणि खटाव माण ॲग्रो प्रोसेसिंग युनिटला अकरा टक्के साखर उतारा मिळाला आहे. उर्वरित पाच कारखाने हे दहा ते सात टक्क्यांपर्यंत उतारा मिळाला आहे.

यावर्षी नोव्हेंबरमध्ये कारखाने सुरू झाले आहेत. आतपर्यंत अडीच महिन्यांत कारखान्यांनी निम्म्यापेक्षा जास्त ऊस तोडला आहे. सहकारी आठ कारखान्यांनी आतापर्यंत ३० लाख ७३ हजार २४२ टन उसाचे गाळप करत ३३ लाख २६ हजार ७८० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सरासरी १०.८२ टक्के साखर उतारा मिळाल्याचे अहवालावरून दिसत आहे, तर खासगी सात कारखान्यांनी आतापर्यंत २९ लाख २६ हजार ३०० टन उसाचे गाळप करत २५ लाख २३ हजार ५२६ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सरासरी ८.६ टक्के उतारा पडला आहे.

यावर्षी तोडणी, वाहतूक यंत्रणा विस्कळित असून, अनेक ठिकाणी आडसाली उसाची अद्याप तोड झालेली नाही. याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. अनेक कारखान्यांनी यंत्रांचा वापर करून तोडणीवर भर दिला आहे. त्यामुळे यावर्षी मार्चपर्यंत हंगाम चालण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कारखानानिहाय साखर उतारा...

सहकारी कारखाने : श्रीराम कारखाना ११, कृष्णा कारखाना १२, किसन वीर कारखाना ११.५, बाळासाहेब देसाई कारखाना ११, सह्याद्री कारखाना १२, अजिंक्यतारा कारखाना १२, रयत अथणी कारखाना ११, प्रतापगड कारखाना ११, खंडाळा कारखाना १०. खासगी कारखाने : दत्त इंडिया ८, जरंडेश्वर ८, जयवंत शुगर १०, ग्रीन पॉवर शुगर ११, स्वराज इंडिया शुगर ८, शरयू ॲग्रो ७, खटाव-माण ॲग्रो ११.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT