Sugar Production : तर साखर कारखानदारीसह शेतकरी अडचणीत येईल, हसन मुश्रीफांची केंद्रावर नाराजी

Hasan Mushrif : दोन महिने साखरेला मागणी नाही. वाढीव साखर येते कोठून?,' असा सवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विचारला.
Sugar Production
Sugar Productionagrowon
Published on
Updated on

Sugar Production Agriculture News : साखर कारखाने सुरू होताना प्रक्विंटल ३६०० रुपयांपेक्षा जास्त दर असणाऱ्या साखरेचा दर आज प्रतिक्विंटल ३४५० पर्यंत खाली आला. दोन महिने साखरेला मागणी नाही. वाढीव साखर येते कोठून?,' असा सवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विचारला.

मागच्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने साखरेचा कोटा जाहीर केला याचा थेट परिणाम साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एफआरपीवर होणार असल्याने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी निर्माण होणार असल्याची खंत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले की, 'जिल्ह्यात दोन महिन्यांपासून साखरविक्री झाली नसल्याने केंद्र सरकारने याच महिन्याचा साखर कोटा कमी करावा, अशी मागणी केंद्राकडे खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने व धनंजय महाडिक यांनी करावी.

तसेच उसाला एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. कारखान्यांनी काही रक्कम वाढवून दिली. एफआरपी वाढवली. मात्र कारखाने सुरु होताना प्रतिक्विंटल साखरेचा ३६०० रुपयांपेक्षा जास्त असणारा दर प्रतिक्विंटल ३ हजार ४५० रुपयांपर्यंत खाली आला. यामुळे, कारखान्यांची दमछाक होत आहे.

साखरेला दोन महिने मागणी नाही. या महिन्याचीही साखर विक्री होणार नाही, अशी परिस्थिती आहे. कारखाने आणि बँका अडचणीत येतील, अशी परिस्थिती आहे. इथेनॉल धोरण बदलले आहे, याचाही फटका बसत असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

केंद्रसरकारचे नेमकं धोरण काय?

केंद्राने यावर्षीच्या गाळप हंगामात म्हणजे आक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या चार महिन्यांसाठी एकूण ९९ लाख टन साखर कोटा कारखान्यांना खुल्या बाजारात विक्रीसाठी दिलेला आहे. गत गाळप हंगामात याच चार महिन्यांसाठी ८९.५ लाख मे. टन कोटा दिला होता. म्हणजे जवळ १० टक्के जादा साखरेचा कोटा बाजारात सोडलेला आहे.

याचा परिणाम मागणी पुरवठ्याच्या तत्त्वानुसार मागणीपेक्षा पुरवठा जादा असेल, तर बाजारातील दरावर त्याचा उलटा परिणाम होऊन मालाचे दर घसरू लागतात. तीच परिस्थिती साखरेच्या दराबाबत आज झालेली आहे.

Sugar Production
Sugar Rate : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून साखरेचा कोटा वाढवला, शेतकऱ्यांसह कारखानदार अडचणीत; साखर दरात घसरण

प्रत्येक महिन्यास सर्वसाधारणपणे रेल्वेने कोल्हापुरातील साखर कारखान्यांचे सरासरी ३० ते ३५ रेक साखर इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठविली जातात. रेल्वेचा एक रेक ४० वॅगनचा असून, एका वॅगनमध्ये ६५० ते ७०० क्विंटल साखर बसते. म्हणजे एका रेल्वे रेकमधून २६५०० ते २७००० क्विंटल साखर भरून पाठविली जाते.

पण, आतापर्यंत केवळ १७ रेकच गेले आहेत. ही परिस्थिती बघता निव्वळ कोल्हापूर जिल्ह्यातून नेहमीपेक्षा इतर राज्यांत जाणारी ५० टक्के साखर या महिन्यात कमी खपलेली आहे. याचा परिणाम कारखान्यांची बँकेकडील साखर माल तारण खात्यावर रक्कम उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होऊन उसाची बिले वेळेत आदा करण्यावर होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com