Sugar Production : यंदा साखरेचे उत्पादन घटलं, सरकार कठोर पावले उचलण्याची शक्यता

India Suagr Production : भारत हा साखरेच्या उत्पादनात जगात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जातो.
Sugar Production
Sugar Productionagrowon
Published on
Updated on

Sugar Rate India : भारत हा साखरेच्या उत्पादनात जगात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जातो. पंरतु यंदा साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता साखर तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यंदाच्या गळीत हंगामात १५ जानेवारी २०२४ पर्यंत साखरेचे उत्पादन ५ टक्के घटून १४९.५२ लाख टनांवर आले असल्याची माहिती भारतीय साखर कारखाने महासंघाकडून देण्यात आली आहे.

मागील गळीत हंगामात १५७.८७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. पंरतु यंदा हे साखरेचे उत्पादन तब्बल ५ टक्क्यांनी घसरल्याने सरकारने याबाबत साखरेवर नियंत्रण ठेवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदा साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार कठोर पावले उचलू शकते, असे सूत्रांनी सांगितले. 'नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रीज'ने (एनएफसीएसएफ) गेल्याच आठवड्यात साखर उत्पादनाचे आकडे जारी केले होते.

साठेबाजी रोखणार

मिळालेल्या माहितीनुसार यंदा लोकसभा निवडणुका असल्यामुळे साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता कमी आहे. यासाठी सरकार कठोर पावले उचलू शकते. कारखाने, साठवण केंद्रे आणि साठेबाजांविरुद्ध सरकारकडून कारवाई केली जाऊ शकते. त्यातून किमती व उपलब्धता नियंत्रणात ठेवण्यात सरकारला मदत मिळू शकेल.

Sugar Production
Sugar Season Maharashtra : साखर हंगामावर दुष्काळाचे सावट; उत्पादन घटलं, उताऱ्यात मात्र कोल्हापूर आघाडीवर

साखर कारखान्यांनी ५८६ कोटींची एफआरपी थकवली

राज्यात तुटून गेलेल्या उसाची एफआरपी रक्कम १३ हजार ६४२ कोटी रुपये होते. यापैकी १३ हजार ५६ कोटीची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. तर अद्यापही अनेक साखर कारखान्यांमधील ५८६ कोटींची रक्कम थकीत आहे. दरम्यान थकीत असलेल्या साखर कारखान्यांनी यादी समोर आली नाही.

राज्यातील ८५ कारखान्यांनी ठरलेल्या दराप्रमाणे एफआरपी अदा केली आहे तर ५० कारखान्यांनी ६० ते ७० टक्के रक्कम अदा केली आहे. ११७ कारखान्यांची चालू हंगामातील एफआरपी थकीत आहे. दरम्यान यंदा कारखान्यांकडे ऊसतोड मजुरांटी कमतरता असल्याने कित्येक ठिकाणी उसतोडीसाठी शेतकरी कारखानदारांकडे विनंत्या करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com