Farmer Loan Waiver : कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना फोन करा; बच्चू कडूसह शेतकरी नेत्यांची शिष्टमंडळाकडे मागणी
Bacchu Kadu Live : राज्य सरकारने बच्चू कडू यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांचे शिष्टमंडळ पाठवले आहे. परंतु कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांना फोन करा, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतल्यामुळे शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही.