Agriculture Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Harvesting : बटाटा, कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात

Rabi Season : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील बटाटा व नवीन लाल कांदा काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. परराज्यातून या दोन्ही पिकांची आवक वाढली आहे.

Team Agrowon

Pune News : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील बटाटा व नवीन लाल कांदा काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. परराज्यातून या दोन्ही पिकांची आवक वाढली आहे. या दोन्ही पिकांचे बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

घोडनदी काठावर तसेच डिंभा उजव्या कालव्यालगत असलेल्या गावांमध्ये शेतकरी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात नगदी पीक म्हणून कांदा व बटाटा पिकाची शेती मोठ्या प्रमाणावर करतात. सध्या बटाटा काढणी अंतिम टप्प्यात आहे. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने बटाट्याचे चांगले उत्पादन निघत आहे.

एका ५० किलो बटाट्याच्या बेणे कट्ट्यापासून १५ ते १६ कट्टे उत्पादन निघत आहेत. एक महिन्यांपूर्वी बटाट्याला प्रतिदहा किलोसाठी ३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत होता परंतु आता बाजारभाव गडगडल्याने १५० पर्यंत बाजारभाव खाली आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे, असे वाळुंजनगर येथील बटाटा उत्पादक महेंद्र वाळुंज यांनी सांगितले.

नवीन लाल कांद्याची काढणी सुरू आहे. याही कांद्याला एक ते दोन आठवड्यापूर्वी प्रती १० किलोस ४०० ते ५०० रुपये बाजारभाव मिळत होता. आता तो प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये मिळत आहे त्यामुळे कांदा उत्पादकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

शुल्क वाढविल्याने निर्यात थंडावली

उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशामध्ये कांदा काढणी सुरू आहे. त्यातच केंद्र सरकारने कांद्यावर २० टक्के निर्यात शुल्क लावले आहे, त्यामुळे निर्यात थंडावली आहे. त्यामुळे नवीन कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचेही बाजारभाव घटले असल्याची माहिती लोणी येथील कांदा व्यापारी नितीन नरवडे आणि गुलटेकडी (पुणे) येथील व्यापारी मच्छिंद्र बाबाजी वाळुंज यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT