Agrowon Podcast : मक्याचा बाजारभाव टिकून; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत मका दर ?

Daily Commodity Rate : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, मका आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीन मंदीतच

सोयाबीनचे भाव कमीच आहेत. सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा किमान ८०० रुपयांनी कमी आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले. आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या भावामध्ये चढ उतार सुरुच आहेत.

जागतिक उत्पादनात झालेल्या वाढीचा परिणाम सोयाबीनच्या भावावर दिसत आहेत. सीबाॅटवरील वायद्यांमध्ये सोयाबीनचा भाव आज ९.७३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
Agrowon Podcast : सोयाबीनचा बाजार मंदीतच; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत तूर दर ?

कापूस दबावातच

देशातील बाजारात यंदा घटलेले उत्पादन, चांगली मागणी आणि कापड निर्यातील मिळत असलेला आधार यामुळे कापूस भावाला सपोर्ट आहे. मात्र आवकेचा दबाव असल्याने कापूस भाव दबावातच आहेत. बाजारात रोज २ लाख गाठींपेक्षा अधिकची आवक होत आहे. तर कापसाचा भाव सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दबावात असून आज ६९ सेंट प्रतिपाऊंडवर भावपातळी होती. कापसाच्या भावात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा नरमला

खरिप कांद्याची आवक वाढल्यानंतर कांदाच्या भावातील तेजी विरली आहे. कांद्याच्या भावात आठवडाभरातच ५५ टक्क्यांपर्यंत घट झाली होती. कमी दिवसात एवढी घट झाल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले.

मात्र सरकार अद्यापही २० टक्के निर्यात शुल्क काढण्याचे नाव घईना. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बाजारात कांद्याला आज सरासरी १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. पुढील दोन आठवड्यांनंतर देशभरातील कांदा आवक आणखी सुधारू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
MSP Soybean Procurement : राज्यात हमीभावाने सोयाबीनची खरेदी फक्त १९ टक्के पूर्ण; खरेदीसाठी उरले फक्त १९ दिवस

मक्याचे दर टिकून

मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे. बाजारातील मक्याची आवक आणि मागणी यामुळे बाजार स्थिरावल्याचे खरेदीदार सांगत आहेत. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून मक्याची बाजारातील आवकही स्थिरावली आहे. तर मालाची गुणवत्ता सध्या चांगली आहे.

त्यामुळे मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या २ हजार १०० ते २ हजार २०० रुपये दिसून येत आहे. यापुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर मक्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे मक्याचे बाजारभाव आणखी सुधारतील, असा अंदाज मका बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला.

डाळिंबाचा बाजार टिकून

बाजारातील आवक कमी असल्याने डाळिंबाचे भाव सध्या टिकून आहेत. पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा डाळिंब पिकाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे बाजारातील आवक कमी तर आहेच शिवाय गुणत्तापूर्ण मालाचा तुटवडा जाणवत आहे. बाजारात सध्या डाळिंबाची आवक पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

तर बाजारात डळिंबाला सरासरी ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. गुणत्तापूर्ण डाळिंब आजही १५ हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे. डाळिंबाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com