Agriculture Harvesting : पाच जिल्ह्यांत गहू वगळता ज्वारी, हरभरा, करडईची काढणी पूर्ण

Harvesting Update : मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाचही जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामातील गहू वगळता रब्बी ज्वारी, हरभरा, करडई आदी पिकांची काढणी पूर्ण झाली आहे.
Agriculture
AgricultureAgrowon

Latur News : मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाचही जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामातील गहू वगळता रब्बी ज्वारी, हरभरा, करडई आदी पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. उशिराने पेरणी झालेल्या काही ठिकाणच्या गव्हाची काढणीही जवळपास अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Agriculture
Kardai Sowing : नांदेडला दहा हजार हेक्टरवर करडईची पेरणी

यंदाच्या रब्बी हंगामात लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यात सर्वसाधारण १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १५ लाख ९२ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११६ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेल्या रब्बी हंगामावरही निसर्गाची अवकृपाच राहिली. पाचही जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर असताना प्रत्यक्षात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०९ टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली होती.

Agriculture
Kardai Crop : मराठवाड्यात ३६ हजार हेक्टरवर करडईचे पीक

या रब्बी ज्वारीची सर्व काढणी आटोपली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ३० हजार ४०६ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८३ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेल्या गव्हाची काढणी सध्या सुरू असून जवळपास ९० ते ९५ टक्के पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर असताना प्रत्यक्षात १० लाख ९ हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली.

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२८ टक्के पेरणी झालेल्या हरभऱ्याची काढणी पूर्ण आटोपली आहे. करडईच सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर असताना प्रत्यक्षात ३४ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी झाली होती. जवळपास दीडपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झालेल्या करडईची काढणीही पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com