Maharashtra Assembly Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly: आमदारांच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळ परिसरात बंदी; अध्यक्षांचा निर्णय

Assembly Rules: राज्य विधीमंडळाच्या परिसरात आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर बंदी, मंत्र्यांच्या बैठकींवर निर्बंध यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Sainath Jadhav

Mumbai News: राज्य विधीमंडळाच्या परिसरात आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर बंदी, मंत्र्यांच्या बैठकींवर निर्बंध यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या या घटनेची चौकशी करण्यासाठी त्यांनी हे प्रकरण आज (ता.८)  विशेषाधिकार समितीकडे सोपवले असून, आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांना सभागृहात खेद व्यक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात बोलताना सांगितले की, विधानमंडळाच्या उच्च प्रथा आणि परंपरांचे पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे. आमदारांनी घेतलेली शपथ आणि संविधानाप्रती असलेले उत्तरदायित्व यांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही महत्त्वाचे नियम जाहीर केले.

यापुढे अधिवेशन काळात विधानमंडळ परिसरात फक्त आमदार, त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच प्रवेश मिळेल. इतर कोणत्याही अभ्यागतांना परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.याशिवाय, मंत्र्यांनी विधानमंडळ परिसरात घेतलेल्या बैठका यापुढे फक्त त्यांच्या दालनातच घ्याव्यात, असेही अध्यक्षांनी स्पष्ट केले.

केवळ अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत, विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती यांच्या मंडळाची परवानगी घेतल्याशिवाय मंत्र्यांना बैठका घेता येणार नाहीत. तसेच, अभ्यागतांना प्रवेश देण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.या गोंधळामुळे सभागृहाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा डागाळली गेली आहे, असे सांगत अध्यक्षांनी या प्रकरणाला विशेषाधिकार भंग आणि सभागृहाचा अवमान असल्याचे म्हटले.

त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांनी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सोपवले आहे. यासोबतच, आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांना सभागृहात खेद व्यक्त करून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची हमी देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दरम्यान, विरोधी पक्षांच्या गोंधळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर आपले मत मांडले. ते म्हणाले की, अध्यक्षांनी मांडलेल्या विषयाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी पाठिंबा द्यावा. या घटनेमुळे संपूर्ण सभागृहाची आणि आमदारांची प्रतिमा मलिन झाली आहे.

त्यामुळे या प्रकरणाला गांभीर्याने घ्यावे आणि प्रत्येक गोष्टीचे राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.या सर्व घडामोडींनंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात खेद व्यक्त केला. तसेच, यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop In Crisis : निलंग्यात ८० हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Jal Jeevan Mission : लातूर जिल्ह्यातील गावागावांतील ‘जल जीवन’ला घरघर

Agrowon Podcast: बेदाण्याचे दर तेजीत, काकडीला मागणी, चिकू महागला; बाजरीचे दर स्थिर, तुरीचे दर दबावात

Flood Management : महापूर येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या?

Crop Loan : खरिपासाठी ११७९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप

SCROLL FOR NEXT