Maharashtra Politics: आज राज्यभर दहीहंडीचा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा होत आहेत. यंदा होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील नेते आणि सेलेब्रिटी विविध ठिकाणच्या दहीहंडीच्या उत्सवाला उपस्थित आहेत. .अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वरळी जांबोरी मैदानातील परिवर्तन दहिहंडी उत्सवाला गेले होते. यावर्षी या दहिहंडीचे आयोजन भाजप पक्षाकडून करण्यात आले होते. याठिकाणी आगामी निवडणुकीला उद्देशून यावर्षी परिवर्तन अटळ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे..Agriculture Scheme: शेतकऱ्यांना रोपवाटीकेसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला दहिहंडी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. 'सर्व नागरिकांनी उत्साहाने आणि सुरक्षिततेने दहिहंडीचा उत्सव साजरा करावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. 'माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच गणपती आणि दहिहंडीवरील सर्व बंधने हटवली आहेत. आता आमचं सरकार आहे, लोकांमध्ये प्रचंड उत्सव आहे. रात्रीपासून पाऊस आहे आणि आजही पावसाचा अंदाज होता, तरीसुद्धा लोकांमध्ये दहिहंडी उत्सवाचा पाऊस त्यापेक्षा मोठा आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले..Dahi Handi 2025 : कोकण नगरच्या गोविंदाची १० थर रचत विश्वविक्रमाला गवसणी.दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकीला लक्ष्य करत महत्त्वाचे विधान केले. 'महापालिकेची पापाची हंडी फोडली आता विकासाची हंडी लावली जाईल आणि त्या हंडीतले लोणी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार' असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले..इतके दिवस लोणी कोण खात होते, असा प्रश्न पत्रकारांनी विचाराल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'इतके दिवस लोणी कोण खात होतं हे लोकांना माहिती आहे', असे म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.