Weather Update : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच गायब झालेल्या पावसाने आता जोरदार पुनरागम केलं आहे. मराठवाड्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती पीक, घरांसह जनावरांचं नुकसान झालं आहे. .मांजरा धरणाचे दरवाजे उघडलेमांजरा धरणातील ४ वक्रद्वारे प्रत्येकी ०.२५ मीटर उंचीने उघडून ३४९४.२८ क्यूसेक्स इतका विसर्ग मांजरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पुढील पावसाच्या स्थितीनुसार विसर्गात बदल करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठावरी गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत..कोकणात मुसळधारकोकणात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि वैभववाडीला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनाल्याच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून काही नद्या इशारा पातळीनजीक पोहोचल्या आहेत..कोयनेच्या पात्रात विसर्गकोयना धरणाच्या क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे, धरण क्षेत्रातील कोयना १०४, नवजा १७४, महाबळेश्वर ११७ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात प्रति सेंकद १९,००८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात शनिवारी सकाळी आठ पर्यंत ८९.९३ टीएमसी (८५.४४ टक्के) पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू करून २१०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देणेत आला आहे..नांदेड जिल्ह्यात फटकानांदेड जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना पोषक वातावरण झाले असले तरी सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, काढणीला आलेले मुग, उडीद या पिकांना फटका बसत आहे. गुरुवारी (ता.१५) जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २७ मंडळात अतिवृष्टी झाली. यानंतर दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी संततधार पाऊस होत आहे. गेल्या २४ तासांत चार मंडलांत अतिवृष्टी झाली.Heavy Rain Update : बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतीपिकांचं नुकसान; खासदार ओम राजेनिंबाळकरांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन .परभणीतही जोरदार हजेरीपरभणी व हिंगोली जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शनिवारी (ता.१६) दुपारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस सुरू होता. दरम्यान शुक्रवारी (ता.१५) परभणी जिल्ह्यातील पाच व हिंगोली जिल्ह्यातील एका मंडलात अतिवृष्टी झाली. मुसळधारेमुळे नदीनाले, ओढ्याचे पाणी पिकांमध्ये शिरले. जमिनी खरडून गेल्यामुळे हळद, ऊस, सोयाबीन, कपाशी, तूर आदींसह भाजीपाल्याचे नुकसान झाले..अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊसअहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात शुक्रवारी (ता. १५) पावसाने हजेरी लावली. शनिवारी (ता. १६) पावसाची उघडीप असली तरी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणाचा पाणलोट असलेल्या अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात मात्र पाऊस सध्या थांबलेला आहे. त्यामुळे प्रमुख धरणातील विसर्ग बंद आहे. गुरुवारी (ता. १४) रात्री, शुक्रवारी (ता. १५) दिवसभर अहिल्यानगर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, राहाता, कोपरगावसह जिल्हाभरातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली..खानदेशात दिलासाखानदेशात सुमारे २२ ते २५ दिवसांनंतर अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. काही भागांत जोरदार पाऊस झाला. माती वाहून जाणे, शेत खरडणे असे प्रकारही नदीकाठी, नद्यांच्या लगत झाले आहेत. पण पावसाने काहीसा दिलासाही मिळाला आहे. खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगावात सर्वत्र कमी व बऱ्यापैकी स्वरुपातील पाऊस झाला आहे. जळगाव, धरणगाव भागात लहान नाले प्रथमच खळखळून वाहू लागले आहेत..Monsoon Rain: विदर्भ, कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता.विदर्भात फटकाविदर्भातील अमरावती, यवतमाळ जिल्हयात ढगफुटी सदृष्य पावसाचा सोयाबीन, कपाशीसह संत्रा बागांना देखील मोठा फटका बसला आहे. चांदूर बाजार तालुक्यात शुक्रवारी (ता.15) पावसाने एकच हाहाकार उडाला. शनिवारी (ता.16) उमरखेड, महागाव, पुसद (यवतमाळ) भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातील लाखपूरी सर्कलमध्ये शनिवारी (ता.१६) दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.