
Maharashtra Politics : महायुती सरकारची एकहाती सत्ता येऊनही अंतर्गत धुसफूस समोर येत आहे. उपमुख्यमंत्री महायुती सरकारमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर अजित पवार यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, काँग्रेसनेते नाना पटोले यांनी धुलवडीच्या निमीत्ताना राजकीय धुळवड खेळत नवा राजकीय डाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनाही मुख्यमंत्रिपदाची खुली ऑफर दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोली यांनी पवार आणि शिंदे यांना महाविकास आघाडीसोबत आल्यास मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली. पटोले म्हणाले की, "एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनीही आता सतर्क व्हायला पाहिजे. त्यांच्यासोबत महाविकास आघाडी आहे. आज धुलीवंदन आहे होळीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना दोघांच्याही सुरक्षेबाबत भूमिका मांडतोय. आमच्याकडे त्यांनी यावं, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ".
"सध्या दोघांनाही मुख्यमंत्रिपदाची ओढ लागली आहे. काही दिवस एकाला, काही दिवस दुसऱ्याला या दोघांनाही मुख्यमंत्री बनवू. भाजपाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू". अशी थेट ऑफर नाना पटोलेंनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर
नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्याना ऑफर दिल्यानंतर एकनाथ शिंदें यांनीही प्रत्युत्तर दिले. "ज्यांना भगवा रंग आवडेल त्यांनी महायुतीसोबत यायला काही हरकत नाही. भगवा रंग हा हिंदुत्वाचा आहे, सनातन धर्माचा आणि वैश्विक रंग आहे. हा भगवा रंग कुणाचा द्वेष करणारा नाही. कुणाला फसवणारा नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी भगव्या रंगात न्हाऊन आमच्यासोबत यावं त्यांना मी शुभेच्छा देतो". अशी मिश्किल टीप्पणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पटोलेंवर केली.
बच्चू कडू यांची काँग्रेसवर जाहीर टीका
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यावर टीका केली. "नानाभाऊंची ही ऑफरच मोठी हास्यास्पद आहे. काँग्रेसचं सध्या स्थिर आहे की नाही हे समजत नाही. काँग्रेसचे २० आमदार आहेत, तर १ तर आताच शिंदे गटात गेले आहेत. नाना पटोले यांची ऑफर चांगली आहे. पण त्यांनी काँग्रेस कुठंय ते शोधलं पाहिजे". अशी खरमरीत टीका नाना पटोलेंनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.