Goseva President Shekhar Mundada Agrowon
ॲग्रो विशेष

Cow Dairy Farm : देशी गायींसाठी लवकरच विशेष दुग्धशाळा : गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा

Agriculture Initiative : गोमातेचे संवर्धन करणे हीच गोसेवा आयोगाची प्राथमिकता असून, राज्यात गो-साक्षरता आणि गो-पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात बरोबरच राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.

मुकूंद पिंगळे

Nashik News : गोमातेचे संवर्धन करणे हीच गोसेवा आयोगाची प्राथमिकता असून, राज्यात गो-साक्षरता आणि गो-पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात बरोबरच राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.

येथील सरस्वती विद्या मंदिर विद्यालयात महाराष्ट्र गोसेवा समितीचे अध्यक्ष शेखर मुंदडा सदिच्छा भेटीसाठी आले होते. या वेळी संवाद मेळावा घेण्यात आला. डॉ.मधुकर आचार्य अध्यक्षस्थानी होते. अॅड. गोरक्षनाथ चौधरी, आयोगाचे सदस्य वर्मा, दुर्गेश दायमा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

गोमातेचे संरक्षण संवर्धन व संगोपन या आयोगाच्या संकल्पना आहेत. गोमातेस राज्यमातेचा दर्जा देणारे भारतातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. गोमातेचे संरक्षण ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. समर्पण असल्याखेरीज काहीही मिळत नाही. गोरक्षण ही आपली जबाबदारी आहे. गोरक्षेसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य गोसेवा आयोग सहकार्य करेल, अशी ग्वाही मुंदडा यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी वणी भाजप मंडळ अध्यक्ष किरण तिवारी, मंडळ सरचिटणीस दर्शन दायमा, कृष्णा घुले, रोशन समदडिया, बाळासाहेब देशमुख, सुरेश वर्मा, दुर्गेश चितोडे, पप्पू चंद्रात्रे, डॉ. राघवेंद्र भुतडा, गोकूळ पालखेडे, जयसिंग राजपुरोहित, किशोर बोरा, अनिल गांगुर्डे, प्रवीण गायकवाड, पंकज शिवले, मोहन देशमुख, वैभव घडवजे, प्रीतेश खाबिया, रोमित बोरा, जितू लिंबानी, संतोष कोंड, मनोज थोरात, कमलेश शर्मा आदींसह मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

Parbhani Water Scarcity: चार लघू सिंचन तलाव आटले

Fertilizer Booking App : ऑनलाइन खत बुकिंगसाठी केंद्र सरकारचा निर्णय

Fertiliser Subsidy: आर्थिक संकटाची चाहूल?; खत अनुदानाचा भार ७० हजार कोटींनी वाढणार, देशात किती खत साठा शिल्लक?

SCROLL FOR NEXT