Cow Conservation : ‘बंदिभागा’तील गोरक्षण

Diwali Article 2024 : यवतमाळ जिल्ह्यापासून १५० ते १७५ किमी लांब उमरखेड तालुक्यातील २१ गावांचा परिसर अभयारण्य घोषित होण्याअगोदर आणि घोषित झाल्यावर सुद्धा या गावांवर वन विभागाने अनेक निर्बंध घातले. त्यांना जंगलात येण्यास बंदी घातली. त्यामुळे हा परिसर ‘बंदिभाग’ म्हणून ओळखला जातो.
Cow Conservation
Cow Conservation Agrowon
Published on
Updated on

संतोष गवळे, बाबूसिंग जाधव

Cow Rearing Protection : ज्या गावातील लोकांच्या पारंपरिक जगण्यावर जंगल विभागाने निर्बंध आणले, पारंपरिक राहणीमानावर, जगण्यावर मर्यादा आणल्या तो भाग म्हणजे ‘बंदिभाग’. यवतमाळ जिल्ह्यापासून १५० ते १७५ किमी लांब उमरखेड तालुक्यातील २१ गावाचा परिसर त्यात मोडतो. हा पैनगंगा अभयारण्यातील व लगतच्या गावांचा भूभाग आहे. अभयारण्य घोषित होण्याअगोदर आणि घोषित झाल्यावर सुद्धा या गावांवर वन विभागाने अनेक निर्बंध घातले. त्यांना जंगलात येण्यास बंदी घातली. त्यामुळे हा परिसर बंदिभाग म्हणून ओळखला जातो.

या भागातील लोकांचं उदरनिर्वाहाचं मुख्य साधन म्हणजे गायी राखणं. गायी जंगलात चराईला घेऊन जाणं अन् त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करणं हा त्यांचा वर्षानुवर्षांचा शिरस्ता. या बंदिभागात आदिवासी समुदायासोबत मथुरा, बंजारा मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतात. मथुरा समाज स्वत:ला श्रीकृष्णाचा वंशज मानतो. कधी काळी मथुरेतून व्यवसायाच्या निमित्ताने ते बाहेर पडले अन् गुरेढोरे सांभाळत ते या जंगलात स्थाईक झाले. बंजारा समाजही बाहेरून येऊन स्थाईक झाला. पण पिढ्या न् पिढ्या गायी राखण्याचं काम करत ते इथलेच झाले आहेत.

Cow Conservation
Cow Rearing : गोठा स्वच्छता, निर्जंतुकीकरणावर भर

ढौळी गाय आणि जंगल

मथुरा लमाण असो किंवा बंजारा समाज असो यांचे या भागातील मुख्य अर्थकारण हे पांढऱ्याशुभ्र गायींच्या कळपाभोवती केंद्रित झालेले आहे. अजूनही असे अनेक परिवार आहेत की जे बैल तयार करून वर्षाकाठी दोन ते तीन लाख रुपये मिळवतात. सकाळच्या वेळी बंदिभागातील गावात मुख्यत्वे तांड्यात प्रवेश केल्यावर नजरेला येते ती रस्त्यालगतची मोठमोठी खोडांगणं (सध्याचा मुक्त गोठा) अन त्याच्या बाजुलां टेकडी सारखी दिसणारे शेणाची उकिरडे.

या भागात त्याला उकंडा म्हणतात. घरापुढे बांधलेल्या ढवळ्या गाईची दावण. शेणाचा सडा टाकलेली अंगणं अन माती-शेणाने सारवलेली चोपडी घरे असं इथलं दृश्य. ओसरीला बांधलेली वासरे त्यांच्या हंबरण्याने आपलं स्वागत करतात. घराची कळा अन् अंगणातील श्रीमंती बघण्यासारखी असायची.

Cow Conservation
Indigenous Cows Conservation : देशी गाईंची उपयुक्तता जाणून करुया संवर्धन

हे चित्र आता बदलत आहे. घरापुढच्या दावणीची जागा आता एक किंवा दोन खुंट्याने घेतली. खोडांगण ओस पडू लागली. शेणाच्या टेकड्या दिसेनाशा झाल्या. याचं मुख्य कारण वन विभागाने घातलेली चराई बंदी अन् आता प्रवेश बंदी. त्यामुळे पशुपालकास गायी विकण्याची वेळ आली.

अन् गावकरी समस्यांच्या विळख्यात सापडले. तेव्हापासून या भागात स्थलांतर वाढलं. बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झाला. अल्पभूधारक शेतकरी असल्याने पिकवावं काय अन् खावं काय असा प्रश्‍न निर्माण झाला. तसेच आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी आदी इतर समस्याही आहेतच. या प्रश्‍नांच्या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी या भागातील लोकांनी एकत्र येत बंदिभाग संघर्ष समितीची स्थापना केली. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या गावांनी एकत्र येऊन लढा सुरू केला.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com