File Photo : India Pak Border  Agrowon
ॲग्रो विशेष

India Afghanistan Trade : भारताची अफगाणिस्तानमधील शेतमाल निर्यात घटली; भू-राजकीय परिस्थितीचा फटका

Agriculture Export : अफगाणिस्तान हा भारतीय साखरेचा चांगला बाजार आहे. परंतु पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे कराची मार्ग बंद करण्यात आला. त्यानंतर इराणमधील अब्बास बंदरमार्गे अफगाणिस्तानला निर्यात सुरू होती. परंतु इस्त्रालयच्या हवाई हल्ल्यामुळे तोही मार्ग सध्या बंद झाला आहे. त्यामुळे भारत-अफगाणिस्तान निर्यात विस्कळीत झाली आहे.

Dhananjay Sanap

Iran Route Export : भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे शेतमाल निर्यात विस्कळीत झाली आहे. भारताकडून अफगाणिस्तानला होणाऱ्या निर्यातीला मर्यादा येत आहेत. त्यातच आता इस्त्रालयच्या इराणवरील हल्ल्याने इराणमार्गे अफगाणिस्तान निर्यातीला अडथळा निर्माण झाला आहे. आधीच आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला होणारी निर्यात २० टक्क्यांहून घसरून ५२.६ दशलक्ष डॉलर्सवर आली आहे. त्यात इस्त्रालय-इराणमधील तणावाने तेल ओतलं आहे. त्यामुळे पुढील काळातही शेतमाल निर्यातीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

साखरेच्या निर्यातीवर परिणाम?

अफगाणिस्तान हा भारतीय साखरेचा चांगला बाजार आहे. परंतु पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे कराची मार्ग बंद करण्यात आला. त्यानंतर इराणमधील अब्बास बंदरमार्गे अफगाणिस्तानला निर्यात सुरू होती. परंतु इस्त्रालयच्या हवाई हल्ल्यामुळे तोही मार्ग सध्या बंद झाला आहे. त्यामुळे भारत-अफगाणिस्तान निर्यात विस्कळीत झाली आहे. भारत अफगाणिस्तानला साखरेची निर्यात करतो. केंद्र सरकारने ३१ मेपर्यंत एकूण लाख १६ हजार ७८२ टन साखर निर्यातीपैकी ७२ हजार ८३३ टन साखर अफगाणिस्तानला पाठवल्याचं ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने सांगितलं आहे.

केंद्र सरकारनं २० जानेवारी रोजी १० लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. ही साखर निर्यात ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी लागणार आहे. सध्याही पाच ते सहा हजार टन साखरेचा करार अफगाणिस्तानसाठी झाला आहे. परंतु भविष्यातील भू-राजकीय परिस्थितीवर निर्यात कराराची भिस्त अवलंबून असल्याचं व्यापारी सांगतात.

निर्यात घसरली?

भारताची अफगाणिस्तानमधील तेलबिया खाद्याची निर्यात २०२४-२५ मध्ये २७.३७ दशलक्ष डॉलर्ससह पहिल्या क्रमांकावर होती. तर तंबाखूची १५.१९ दशलक्ष डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर होती. आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये दोन्ही निर्यातीत वाढ झाली होती. परंतु मसाले, साखर आणि प्रक्रिया केलेली फळांची निर्यात २०२३-२४ तुलनेत घटली होती. मसाले निर्यात १९.९२ दशलक्ष डॉलर्स, साखरेची ८.६९ दशलक्ष डॉलर्स तर प्रक्रियायुक्त फळांची निर्यात ५.५१ दशलक्ष डॉलर्सवर घसरली होती.

२०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता बळकावल्यानंतरही भारताच्या व्यापारावर कोणताही परिणाम झाला नव्हता. तालिबान सरकारला अद्यापही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नसली तरी निर्यात-आयात पूर्वीसारखी सुरूच आहे. परंतु भारत-पाक आणि इस्त्रालय-इराणमधील तणावाच्या संबंधाचा आता फटका बसू लागला आहे, असंही व्यापारी सांगतात.

पाकिस्तान मार्गे आयात ठप्प

दुसरीकडे भारत अफगाणिस्तानमधून सुकामेवा आयात करतो. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६४१ दशलक्ष डॉलर्सची आयात केली होती. २०२४-२५ मध्ये सुकामेवा आयात ६४१ दशलक्ष डॉलर्सवर पोहचली. सध्याच्या आर्थिक वर्षातील संपूर्ण आयात आकडेवारी सरकारनं अजून जाहीर केलेली नाही. परंतु एप्रिल-मे २०२४ दरम्यान जवळपास ५८ दशलक्ष डॉलर्सची आयात झाली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानकडून आयात होणाऱ्या शेतमालामध्ये मनुके, सफरचंद, लसूण, जर्दाळू, वाळवलेली डाळवर्गीय भाज्या, कांदे, डाळिंब, अक्रोड, प्रून, प्लम, काजू, कलिंगड, नाशपती यांचा समावेश होतो. परंतु पाकिस्तान मार्ग बंद झाल्याने अफगाणिस्तानकडून होणारी आयात ठप्प झाली आहे, असं व्यापारी सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Plantation : मृग बहर केळी लागवड ६० हजार हेक्टरवर

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाची मध्यम ते दमदार हजेरी

Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

Darwin Theory: ‘डार्विन उत्क्रांती’ सिद्धांताच्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT