Nashik News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने ‘एनएमआरडीए’कडून सध्या नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शेतकऱ्यांवर बुलडोझर चालवला जात आहे. या स्त्यावरील शेतकऱ्यांवर ‘एनएमआरडीए’कडून कारवाई सुरू आहे. मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांना वडिलोपार्जित जमिनीतून बेदखल केले जात आहे. .घरे आणि बांधकाम पाडले जात आहेत. शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले होते. अखेर एनएमआरडीएच्या कारवाईला उच्च न्यायालयाने दणका दिला. त्यामुळे २३ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने ‘एनएमआरडीए’कडून त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शेतकऱ्यांवर बुलडोझर चालवला जात आहे. कोणताही पंचनामा आणि मोबदला न देता कोट्यवधी रुपयांचे बांधकाम पाडण्यात आली आहेत. .Land disputes: शेत जमिनीचे वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेला दोन वर्ष मुदतवाढ; राज्य सरकारचा निर्णय.त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल आहे. याबाबत अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली.दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही जुमानले जात नाही, असेच चित्र येथे पाहायला मिळत आहे. या विरोधात माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांनी जागरूकता निर्माण केली. प्रारंभी रास्ता रोको आणि त्यानंतर एनएमआरडीएच्या दडपशाही करणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध केला. .या संदर्भात एमआरडीएच्या विरोधात माजी नगरसेवक जायभावे यांच्या पुढाकाराने उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. त्यासाठी विविध शेतकऱ्यांचे कायदेविषयक प्रबोधन करण्यात आले. यासंदर्भात प्रभाकर खराटे, सोमनाथ घोटेकर, उत्तमराव खांडबहाले, दिगंबर ढगे, मेघराज गामणे वकिलांनी साहाय्य केले..Land Dispute : देवळालीच्या तीन गावांतील जमीन व्यवहारांवरील निर्बंध हटविणार.शेतकऱ्यांचा लढा अधिक जोमाने लढण्याचा निर्धार‘एमएमआरडीए’ने उच्च न्यायालयात आधीच कॅव्हेट दाखल केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाकडून स्थगिती आदेश देण्यात आला आहे..यापुढे शेतकरी कायदेशीर मार्गाने न्यायालयात लढा देणार आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे. दरम्यान बुधवारपासून कैलास खांडबहाले यांनी उपोषण सुरू केले आहे.त्यामुळे त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील संकटग्रस्त शेतकऱ्यांचा लढा यापुढे अधिक जोमाने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.