Nashik News : खरीप हंगामातील मका, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, बाजरी व करडई काढणीचे काम सुरू झाले आहे. शेतकऱ्यांचा हा शेतमाल एकाचवेळी बाजार आवारावर विक्रीस येत असल्यामुळे बाजारभाव कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून लासलगाव बाजार समितीने दरवर्षीप्रमाणे सन २०२५-२६ या हंगामाकरिता शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप यांनी दिली..महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,पुणे या संस्थेमार्फत सन १९९०–९१ पासून राबविण्यात येणा-या या योजनेंतर्गत बाजार समिती सन २०२५–२६ या हंगामाकरिता मका, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी व करडई या प्रमुख शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणार आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच माल तारणात ठेवला जाणार आहे. .Crop Loan : पीक कर्ज वितरण आढावा बैठकच नाही.शासकीय प्रतवारीकार व बाजार समितीचे प्रतवारीकार यांनी संयुक्तरित्या शिफारस केलेला मका, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी व करडई हा शेतीमाल ज्या दिवशी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात तारण म्हणून ठेवला जाईल. .त्या दिवसाचे सरासरी बाजारभाव किंवा त्या मालाचे किमान आधारभूत दर यापैकी जे कमी असेल ते विचारात घेऊन बाजार समिती वखार महामंडळाचे पावतीप्रमाणे स्वनिधीतून संबंधित शेतकऱ्यास धनादेशाद्वारे रक्कम अदा करणार आहे..Crop Loan Distribution: आंबेगावात ९४७६ शेतकऱ्यांना ६६.५१ कोटींचे पीककर्ज वाटप.संबंधित शेतकऱ्यांचा खाते उतारा व ७/१२ उताऱ्यावरील लागवड क्षेत्र व उत्पादित माल याचे प्रमाण ठरवून एकूण किमतीच्या ७५ टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून ६महिन्यांचे मुदतीने ६टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे..त्यानंतरच्या ६ महिन्यांकरिता ८ टक्के व त्यापुढील ६ महिन्यांकरीता १२ टक्के व्याज दराने आकारणी केली जाणार आहे. १८ महिन्यांनंतर सदर कर्जास मुदतवाढ मिळणार नाही. शेतकरी बांधवांनी एक योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी बाजार समितीच्या लासलगाव मुख्य कार्यालयात अथवा ९९२१४२३५३६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (डी.के.) जगताप, उपसभापती संदीप (ललीत) दरेकर व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.