देशात या आर्थिक वर्षात पाम लागवड क्षेत्रात आतापर्यंत ५२,११३ हेक्टरपर्यंत वाढ झाली आहेदेशभरात आता एकूण क्षेत्र ६ लाख हेक्टरवर पोहोचलेसर्वाधिक पाम लागवड तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात .Palm Cultivation: देशात या आर्थिक वर्षात पाम लागवड क्षेत्र आतापर्यंत ५२,११३ हेक्टरपर्यंत वाढले आहे. सर्वाधिक पाम लागवड तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात झाली आहे, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. या नवीन क्षेत्र वाढीमुळे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेल पाम (NMEO-OP) योजनेअंतर्गत तेल पाम क्षेत्र २ लाख ४१ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. तर देशभरात आता एकूण क्षेत्र ६ लाख हेक्टरवर पोहोचले आहे.."देशात पाम लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. २०२५-२६ आर्थिक वर्षात २२ ऑक्टोबरपर्यंत हे क्षेत्र ५२,११३ हेक्टरवर पोहोचले," असे कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे..Palm Cultivation : बांबूसोबत पाम लागवडीचा पर्याय विचाराधीन.नवीन क्षेत्रांमध्ये आंध्र प्रदेशातील १३,२८६ हेक्टरचा समावेश आहे. त्यानंतर तेलंगणात हे क्षेत्र १२,००५ हेक्टरवर आहे. छत्तीसगड, गोवा आणि गुजरातमध्येही लागवड झाली आहे. .आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील शेतकरी उच्च उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने पाम लागवडीकडे वळले आहेत. येथील बहुतांश शेतकऱ्यांनी कोको आणि इतर पिकांसह ते आंतरपीक म्हणून घेतले आहे, असेही अधिकारी सांगतात..Palm Oil Import Duty: रिफाइंड पामतेलावर आयात शुल्क वाढवण्याची एसईएची मागणी! .भारतात सध्या अंकुरित पाम बियाणे आयात केली जातात. शेतात लागवड करण्यापूर्वी ती १८ महिने रोपवाटिकांमध्ये वाढवली जातात. या प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकारने यावर्षी बियाणे बागांना मंजुरी दिली आहे, असेही अधिकारी म्हणाले..एनएमईओ-ओपी योजनेअंतर्गत, ताशी ६३८.५ टन क्षमतेच्या २४ मिल्सना मंजुरी देण्यात आली आहे. २०२५-२६ आर्थिक वर्षात २ लाख हेक्टरवर पाम लागवड क्षेत्र विस्तारण्याचे लक्ष्य कृषी मंत्रालयाने ठेवले आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम ही राज्ये पाम लागवडीत आघाडीवर असल्याचे दिसते..देशात पाम लागवडीसाठी योग्य अशा २८ लाख हेक्टर जमिनीची निवड केली आहे. ज्यातून सोयाबीन, सूर्यफूल, मोहरी आणि भुईमूग यांसारख्या तेलबियांपेक्षा प्रति हेक्टर १० पटीने अधिक तेल उत्पादन मिळेल.देशात खाद्यतेलाच्या गरजेच्या ५७ टक्के तेल आयात केले जाते. यात पाम तेलाचे प्रमाण सर्वाधिक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.