Nashik News : शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने एप्रिल महिन्यापासून कांद्याची साठवणूक केली आहे. मात्र उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. त्यातच वातावरणीय बदलांमध्ये कांदा सडू लागला आहे. दुसरीकडे वजनात देखील घट होत आहे..अशा परिस्थितीत सणासुदीला व रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी कांदा विक्री करत आहे; मात्र जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दिवाळीदरम्यान आठवड्यापेक्षा जास्त दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची कोंडी होऊन आवक मंदावण्याची शक्यता आहे..सप्टेंबरअखेर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात आहे. हातात पैसा नाही. पंचनामे झाले मात्र अनेकांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. सण कसा साजरा करायचा हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. .Onion Rate : बाजारभावाअभावी स्वप्नांवर पाणी .मात्र कांद्यासाठी देशभरात ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समित्या १७ ऑक्टोबरपासून लिलाव बंद असून ते थेट २७ ऑक्टोबर रोजी लिलाव सुरू होतील. दिवाळीच्या दरम्यान दहा दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे..आपत्कालीन परिस्थिती व इतर मजूरटंचाई सारख्या इतर प्रश्नांवर तीन दिवसांपर्यंत बाजार समिती बंद राहिल्यास शेतकऱ्यांची अडचण होत नाही. शेतकरी तत्काळ काही पर्याय शोधतात. मात्र जिल्ह्यातील सर्वच बाजार समिती दिवाळीच्या निमित्ताने बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी करायचे काय हा प्रश्न आहे? व्यापारी अर्जावरून अनेक ठिकाणी बाजार समित्यांनी सुट्ट्या जाहीर केल्याने संचालक मंडळ कोणाच्या हितासाठी काम करत आहे? हा सवाल उपस्थित होत आहे..कांद्याला अपेक्षित भाव नाही दुसरीकडे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने दिवाळी सणासुदीला पैशांची गरज आहे तर प्रामुख्याने उन्हाळा कांद्याची साठवणूकक्षमता संपुष्टात आल्याने कांद्याचे नुकसान वाढत आहे. त्यामुळे सर्व बाजूने कांदा उत्पादक अडचणीत आहे.दिवाळीच्या काळात मजूर टंचाईचे कारण पुढे दिले जाते.त्यानुसार व्यापारी अर्जानुसार कामकाज बंद ठेवण्याचा दरवर्षीचा प्रघात झाला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे..Onion Project: कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देणार.पणन संचालकांच्या आदेशाला पुन्हा केराची टोपलीतीन दिवसांपेक्षा अधिक दिवस लिलाव बंद नको, असे पणन संचालनालयाचे लेखी आदेश आहेत. मात्र तीन दिवसांपेक्षा अधिक म्हणजे काही ठिकाणी १० दिवस कांदा लिलाव बंद राहतील. त्यामुळे पणनच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार जिल्ह्यातील बाजार समितीकडून पुन्हा होत आहे. व्यापाऱ्यांच्या दबावापुढे काही ठिकाणी बाजार समित्यांची हतबलता अप्रत्यक्षपणे पाहायला मिळत आहे. तर शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे संचालक मंडळ यावर गप्प असल्याने संताप व्यक्त होत आहे..राज्य सरकारने बाजार समित्यांवर शिस्त लावणे अत्यावश्यक आहे. बाजारपेठा कोणाच्या खासगी मालकीच्या नसून,त्या शेतकऱ्यांच्या श्रम आणि उत्पादनावर उभ्या आहेत. जास्त दिवस बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवणे हे अन्यायकारक आहे लिलाव बंद ठेवण्याचे अधिकार हे सणाच्या प्रमुख दिवसांपूरते मर्यादित असावेत आणि शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचवणारे निर्णय घेणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.