
Solapur News : करकंब परिसरात सलग पाच दिवस पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसानंतर आजही (शनिवार) दिवसभर पावसाची रिपरिप चालूच राहिली. त्यामुळे सूर्यदर्शन तर झालेच नाही, परंतु जनजीवनही विस्कळित झाले आहे.
विशेष म्हणजे, दरवर्षी या दिवसांत कडक उन्हाचा आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, यावर्षी मात्र जिकडे-तिकडे पाणीच पाणी साचून बेडकांचा ‘डराव डराव’ आवाज ऐकायला मिळत आहे.
शुक्रवारची (ता. २३) सकाळ संततधार पावसातच उजाडली. शनिवारीही (ता. २४) तीच परिस्थिती राहिली. पूर्व क्षितिजावर अभ्राच्छादित आकाशामुळे सूर्योदयाचे दर्शन झालेच नाही. दिवसभरही संपूर्ण आकाश काळ्या नभांनी भरलेलेच राहिले आणि अधून-मधून सातत्याने पावसाच्या सरी कोसळतच राहिल्या.
सातत्याने रिपरिप पडणाऱ्या पावसाचा अधून- मधून जोर वाढत होता. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही शक्य झाले नाही. चाकरमान्यांची तर चांगलीच तारांबळ उडाली. सर्व शेती कामेही ठप्प झाली होती.
अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले तर ज्यांनी दुकाने उघडली त्यांना अख्खा दिवस ग्राहकांच्या प्रतीक्षेत घालवावा लागला. सुट्टीमुळे धमाल करणाऱ्या मुला-मुलींनाही घरात बसूनच राहावे लागले. लग्नाच्या तिथींमुळे वधू- वरांच्या माता- पित्यांसह वऱ्हाडी मंडळींचेही हाल झाले. लग्न सोहळ्यातील उपस्थितीवरही पावसाचा परिणाम झाल्याचे दिसून आले.
द्राक्षची वाढली चिंता
गतवर्षी पावसाने ओढ दिली होती. परिणामी द्राक्षांच्या एप्रिल छाटणीनंतर काडी तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन उत्पादनात घट झाली होती. परंतु ऑक्टोबर छाटणीनंतर मात्र निसर्गाने साथ दिल्याने द्राक्षे आणि बेदाण्याला चांगला दर मिळाला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.