Electricity Theft  Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Theft : चुकीच्या वीजदेयकाचा आइस फॅक्टरीचा दावा फेटाळला

Sai Nath Ice Factory : सासवड येथील साईनाथ आईस फॅक्टरीला वीजचोरी प्रकरणात दिवाणी न्यायालयाने दुसऱ्यांदा दणका दिला आहे.

Team Agrowon

Baramati News : सासवड येथील साईनाथ आईस फॅक्टरीला वीजचोरी प्रकरणात दिवाणी न्यायालयाने दुसऱ्यांदा दणका दिला आहे. वीजचोरीपोटी आकारलेले देयक चुकीचे असल्याचा दावा फेटाळल्याने साईनाथ आईस फॅक्टरीला ३५ लाख ८६ हजारांचा दंड भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचे न्यायालयाने बजावल्याने वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

महावितरणच्या भरारी पथकाने सासवड येथील साईनाथ आईस फॅक्टरीची वीजचोरी अनुक्रमे ६ एप्रिल २०२२ व १५ मार्च २०२३ अशी दोनवेळा उघडकीस आणली होती. पहिल्या वेळी आईस फॅक्टरीला २ लाख ३४ हजार २४३ युनिटची चोरी केल्याबद्दल ३५ लाख ८६ हजारांचा दंड आकारला होता.

आकारलेल्या दंडाबाबत व वीजपुरवठा जोडून देण्याबाबत साईनाथ फॅक्टरीचे मालक नारायण दगडू पवार यांनी दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. दिवाणी न्यायालयाने बिल कायम ठेवले. त्यांनतर श्री. पवार यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली. यामध्ये आरोपीला काही काळ अटकसुद्धा झाली होती.

दरम्यान पहिले प्रकरण दिवाणी न्यायालय (वरिष्ठस्तर) यांच्या कोर्टात दावा चालू असताना साईनाथ आईस फॅक्टरीने दुसऱ्यांदा मीटर बायपास करून वीजचोरी केली. महावितरणच्या भरारी पथकाने १५ मार्च २०२३ रोजी ही वीजचोरी उघडकीस आणली. तेव्हा या ग्राहकाला पुन्हा २२ लाख ३२ हजारांचा दंड आकारला.

ही रक्कम ग्राहकाने भरली मात्र पहिल्या चोरीतील दंडाची रक्कम पूर्ण भरलेली नव्हती. त्यामुळे जोपर्यंत ३५ लाख ८६ हजारांचा दंड संपूर्ण भरला जात नाही तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून ग्राहकाचा अर्ज फेटाळून लावला.

याउपर आईस फॅक्टरीने वीजचोरीचे देयक चुकीचे असल्याचा दावा केला. परंतु न्यायालयात देयक चुकीचे असल्याचे सिद्ध करता न आल्याने मे. साईनाथ आईसफॅक्टरीचा हा दावाही फेटाळला. या प्रकरणी महावितरणतर्फे ॲड. सचिन खंडागळे व ॲड. गणेश डिंबळे यांनी बाजू मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT