Electricity Theft : वीज चोरी प्रकरणी ६ कोटी ९ लाख रुपये दंडाची रक्कम वसूल

Mahavitaran : महावितरणच्या स्थानिक प्रादेशिक कार्यालयाच्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एप्रिल २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या सहा महिन्यात कालावधीत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविण्यात आली.
Electricity
Electricity Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : महावितरणच्या स्थानिक प्रादेशिक कार्यालयाच्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एप्रिल २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या सहा महिन्यात कालावधीत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये २,६७३ वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यात १,४५१ मीटरमध्ये वीज चोरी आढळून आली. यात १४०१३६९७ युनिट वीज चोरी प्रकरणी १० कोटी १० लाख रुपयांच्या अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेची आकारणी करण्यात आली आहे.

तर ६ कोटी ९ लाख ८६ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.व ६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरण कडून देण्यात आली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर,धाराशिव व बीड जिल्ह्यात एप्रिल २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत भरारी पथक आणि दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविली.

Electricity
Agriculture Electricity : अनेक शिवारांत रोहित्र दुरुस्तीबाबत चालढकल

विघुत कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो.

Electricity
Electricity Bill : सरसकट शेतीपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी

तसेच कलम १३५ मध्ये मीटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सव्हिेसवायर टॅप करणे व कलम १३८ मध्ये महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तु चोरी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे.

अनधिकृत विजेचा वापर करू नये. अनधिकृतपणे विजेचा वापर करतांना आढळून आल्यास विद्युत कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज चोरीची रक्कम लाख रुपयांमध्ये पुढील प्रमाणे

वीज चोरी पथक ग्राहक वीज चोरीची रक्कम

छ. संभाजीनगर शहर ३२८ २२९

छ. संभाजीनगर ग्रामीण १५१ १५०

जालना १९९ १५२

छ. संभाजीनगर परिमंडल ६७८ ५३१

बीड ८५ ५९

धाराशिव ११५ ७२

लातूर २१९ १४८

लातूर परिमंडल ४१९ २७९

नांदेड १६५ ८८

हिंगोली ७६ ३४

परभणी ११३ ७८

नांदेड परिमंडल ३५४ २००

मराठवाडा एकूण १४५१ १०१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com