Solapur News : पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरीविरोधी एकदिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ११५२ ठिकाणी सुमारे १ कोटी ५८ लाख रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार करून ८९६ ठिकाणी ९९ लाख ९८ हजार रुपयांची थेट वीजचोरी झाल्याचे आढळून आले.
पुणे प्रादेशिक विभागांतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार नुकतीच ही एकदिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वर्गवारीतील वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये ज्या उद्देशासाठी वीजजोडणी घेतली, त्याऐवजी वाणिज्यिक व इतर कारणांसाठी वापर सुरू असलेले २५६ प्रकार उघडकीस आले आहेत. त्यांना कलम १२६ नुसार दंड, व्याजासह ५८ लाख १९ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे. तसेच थेट चोरीद्वारे विजेचा वापर होणारे ८९६ प्रकार या मोहिमेत उघड झाले. त्यांना कलम १३५ नुसार वीजचोरीप्रकरणी दंड व वीजवापराचे ९९ लाख ९८ हजार रुपयांचे बिल देण्यात आले.
वीजचोरीची जिल्हानिहाय संख्या, दंड
वीजचोरांची संख्या आणि कंसात त्यांच्या दंडाची रक्कम ः पुणे जिल्हा- ६६२ (१ कोटी २८ लाख ८५ हजार), सातारा- ७८ (५ लाख ८४ हजार), सोलापूर- २२३ (१२ लाख ५७ हजार), कोल्हापूर- ६९ (१ लाख ४८ हजार) व सांगली जिल्ह्यात १२० (९ लाख ४३ हजार). एकूण ११५२ ठिकाणी १ कोटी ५८ लाख १७ हजार रुपयांचा अनधिकृतपणे वीजवापर उघडकीस आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.