Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Plantation: मुसळधार पावसाचा भात लागवडीत खोडा

Monsoon Impact: भात पिकाची सरासरीच्या ६१ हजार १०१ हेक्टरपैकी ४९ हजार ५५९ हेक्टर म्हणजेच ८१ टक्के लागवड होऊ शकली आहे. त्यामुळे अजूनही भात लागवडीपासून ११ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र दूर असल्याचे चित्र आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने पुणे जिल्ह्यात भात लागवडीत खोडा घातला आहे. परिणामी भात पिकाची सरासरीच्या ६१ हजार १०१ हेक्टरपैकी ४९ हजार ५५९ हेक्टर म्हणजेच ८१ टक्के लागवड होऊ शकली आहे. त्यामुळे अजूनही भात लागवडीपासून ११ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र दूर असल्याचे चित्र आहे.

यंदा पूर्वमोसमी पावसाने मे मध्ये सुरुवात केल्याने जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक गावांतील शेतकऱ्यांची शेताची रान भाजणी व भात रोपे टाकण्याची कामे अर्धवट झाली होती. त्यामुळे रोपांची टंचाई भासल्याने भात लागवडी खोळंबल्या होत्या. उसनवारीवर रोपे घेऊन भाताच्या लागवडी करत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता भाताच्या लागवडी अंतिम टप्प्यात आहेत.

मावळ, मुळशी, भोर, राजगड, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी धूळ वाफेवर भात पेरणी केली जाते. तर काही ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाच्या ओलीनंतर पेरणी केली जाते. मात्र, यंदा मॉन्सून लवकर झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्या.

तालुकानिहाय भात पिकाची लागवड (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र लागवड क्षेत्र टक्के

हवेली २०६४ १७२० ८३

मुळशी ७६६० ५८२२ ७६

भोर ७५०० ६५१७ ८७

मावळ १२,९५० ९४५७ ८७

वेल्हे ५०२५ ४५०३ ९०

जुन्नर ११,१२९ ८४५० ७६

खेड ७७५० ६८७३ ८९

आंबेगाव ५७३७ ५१३१ ८९

दौंड ० ४२ ०

जिल्ह्यात मे पासून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना पूर्वतयारी करता आली नाही. ज्या ठिकाणी काहीशी उघडीप दिली तेथील शेतकऱ्यांनी भात रोपे तयार करून लागवडी केल्या. त्यामुळे बऱ्यापैकी भात लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु अजूनही काही क्षेत्रावर लागवडी झालेल्या नाहीत.
संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT