कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे ऊसदरासाठीचे आंदोलन चिघळले'आंदोलन अंकुश'चे प्रमुख धनाजी चुडमुंगे आणि इतर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकडकारखाना समर्थकांनी आंदोलकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप.Kolhapur Sugarcane Protest: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे आज शनिवारी ऊसदरासाठीचे आंदोलन चिघळले. यावेळी 'आंदोलन अंकुश'चे प्रमुख धनाजी चुडमुंगे आणि इतर आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली. ऊसदराचे आंदोलन कारखानदारांकडून दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. .शिरोळ येथील दत्त कारखान्याने चालू वर्षी तुटणाऱ्या उसाला प्रतिटन ३,५०० रुपये दर जाहीर केला आहे. हा दर आम्हाला मान्य नसल्याची भूमिका 'आंदोलन अंकुश'ने घेतली आहे. शनिवारी दुपारी साखर कारखान्यांना नियमबाह्य ऊस वाहतूक करणारी वाहने 'आंदोलन अंकुश'च्या कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारखाना समर्थकांनी धनाजी चुडमुंगे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शिरोळमध्ये दिवसभर वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, सायंकाळी उशिरा आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना नोटीस लागू करून सोडून देण्यात आले..Karnataka Sugarcane Price: कर्नाटकातील ऊसदरावर निघाला तोडगा, टनामागे ३,३०० रुपये दर जाहीर, शेतकरी आंदोलनाचा शेवट गोड. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यास जात होता, त्या शेतकऱ्यांनी शिरोळ पोलिसांत आंदोलन अंकुशच्या प्रमुखासह काही कार्यकर्त्यांवरती तक्रारी दाखल केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौज मोठा तैनात केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. .Sugarcane Rate: ऊसदराच्या कोंडीवर तोडगा नाही.शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याने ३,४०० रूपये ऊस तुटल्यापासून १४ दिवसांत आणि उर्वरीत १०० रुपये फेब्रुवारी महिन्यात देण्याबाबत निर्णय घेतला आहे. यावर्षीच्या पहिल्या उचलीबाबतचा तोडगा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मान्य केला आहे. पण आंदोलन अंकुश संघटनेने हा दर मान्य नसल्याची भूमिका घेतल्याने आंदोलन पेटले आहे..जयसिंगपूर विभागाचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलनकर्त्यांना बेकायदेशीर आंदोलन करू नका, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला..दरम्यान, इचलकरंजीतील पंचगंगा कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन सुरु केले आहे. ऊसदर जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.