Yavatmal News: कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीचा आधार घेत भारतीय कापूस महामंडळाने निश्चित केलेले जिल्हानिहाय खरेदीचे उद्दिष्ट अत्यल्प आहे. यामुळे उर्वरित कापसाची विक्री शेतकऱ्यांना खुल्या बाजारात करावी लागेल, यातूनच बाजारात दर पडणार आहेत. परिणामी, शेतकऱ्यांकडील सरसकट कापसाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी केली आहे. .केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह तसेच नितीन गडकरी यांना पाठविलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. पत्रानुसार, भारतीय कापूस महामंडळाने २०२४-२५ या वर्षात २९.५४ क्विंटल प्रति हेक्टर (१२ क्विंटल प्रति एकर) याप्रमाणे कापूस खरेदीसाठी उद्दिष्ट निश्चित केले होते. यावर्षी मात्र कृषी विभागाच्या पीक कापणी प्रात्यक्षिकांचा हवाला देत जिल्हानिहाय कापूस खरेदीसाठीची सीमा निश्चित करण्यात आली आहे..Cotton Procurement: कापसाची खरेदी मर्यादा यंदा कमी असल्याने रोष.गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणारे कापसाचे उद्दिष्ट यावर्षी कमी करण्यात आले आहे. सीसीआयने २०२५-२६ या वर्षाकरिता यवतमाळ तसेच वाशीमकरिता उद्दिष्ट निर्धारित करताना प्रति हेक्टर रुई उत्पादनाचा आधार घेतला. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात ४३० किलो रुई प्रति हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात ५८७ किलो रुई प्रति हेक्टर तर महाराष्ट्रात रुई उत्पादकता ४४८ किलो प्रति हेक्टर अशी आहे..त्याच वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे प्रकाशित कृषी संवादिनी २०२५ च्या पान क्रमांक १२६ वर यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी ५० क्विंटल प्रति हेक्टर (२० क्विंटल प्रति एकर) पर्यंत उत्पादकता मिळवीत असल्याचे नमूद केले आहे. .Cotton Soybean Procurement: कापूस, सोयाबीन खरेदीच्या गोंधळामुळे शेतकरी अडचणीत.Cotton Procurement...असे आहे उद्दिष्ट प्रति हेक्टर प्रति क्विंटल तर (चौकटीत प्रति क्विंटल प्रति एकर) यवतमाळ १३.६५ (५.५२) वाशीम १६.६७ (६.७५).कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागाने ‘सीसीआय’ला यवतमाळ जिल्ह्याची वर्ष २०२४-२५ या वर्षातील कापूस रुई उत्पादकता २९१ किलो प्रति हेक्टर ही चुकीची कळविली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या १६ तालुक्यांत ११० महसूल मंडले आहेत. यातील प्रत्येक मंडलात १२ पीक कापणी प्रत्येक होतात. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये कापसाची उत्पादकता प्रति हेक्टर ११३८ किलो (३९८ किलो रुई/हेक्टर), २०२४-२५ मध्ये कापूस १११४ किलो प्रति हेक्टर (रुई ३९० किलो प्रति हेक्टर) याप्रमाणे होती. यावर्षी मात्र कमी उत्पादकता दर्शविण्यात आली असून ती अशास्त्रीय आहे. - मिलिंद दामले, प्रमुख, शेतकरी संघटना तंत्रज्ञान व विस्तार आघाडी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.