Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

Paddy Farming : पालघर जिल्ह्यातील भातलावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आतापर्यंत ८२ टक्के क्षेत्रफळावर लावणी पूर्ण झाली आहे.
Paddy Farming
Paddy Farming Agrowon
Published on
Updated on

Palghar News : पालघर जिल्ह्यातील भातलावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आतापर्यंत ८२ टक्के क्षेत्रफळावर लावणी पूर्ण झाली आहे. हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे लावणीसाठी अनुकूल वातावरण असल्याने काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे ७८ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रफळावर भातलावणी केली जाते. डहाणू तालुक्यात सर्वाधिक १६ हजार ५२० हेक्टर, तर मोखाडा तालुक्यात सर्वात कमी दाेन हजार १५ हेक्टर क्षेत्रावर लागवड होते.

जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, मात्र ८ ते २० जुलैदरम्यान पावसाने दडी मारल्याने शेतकरी काळजीत पडला होता, परंतु त्यानंतर दररोज हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असून, यामुळे भातपिकाला जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात ६४ हजार ९१८ हेक्टर क्षेत्रफळावर म्हणजेच ८२ टक्के भातलावणी पूर्ण झाली आहे.

Paddy Farming
Paddy Plantation : शिराळा तालुक्यात भात पेरणी ५० टक्के

जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांतील डोंगर उतारांवर नागलीची लागवड केली जाते. नागलीचे खरीप हंगामात सरासरी १२ हजार ७७८ हेक्टर क्षेत्र लागवडीखालील असून, आतापर्यंत सात हजार ६०१ हेक्टर (५९ टक्के) क्षेत्रफळावर लागवड पूर्ण करण्यात आली आहे.

मजुरांची कमतरता असल्याने हाल

 वाडा तालुक्यात मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांचा यांत्रिकी भातलावणीकडे कल जास्त असल्याचा दिसत आहे. यात मेहनत, वेळ व खर्चाची मोठी बचत होत आहे. एकाचवेळी सर्व तालुक्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाल्याने वाडा तालुक्यात मजुरांची मोठी कमतरता नेहमीच भासते. त्यामुळे विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर आणावे लागतात.

Paddy Farming
Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

त्यात मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. एका शेतमजुराला दररोज ४५० ते ५०० रुपये अधिक सकाळी न्याहरी, दुपारी जेवणही द्यावे लागते. त्यामुळे शेती हा जास्त कष्टाचा आणि खर्चीक व्यवसाय होऊ लागला असल्याने ती अनेकांना परवडेनाशी झाली आहे.

 खर्च, मेहनत व वेळेची बचत होत असल्यामुळे यांत्रिकी पद्धतीने शेती करण्याचा कल शेतकऱ्यांचा वाढला असल्याचे दिसत आहे. यांत्रिकी पद्धतीने भातलावणी, भात कापणी व झोडणी केल्यास मेहनत, वेळ व खर्चाची मोठी बचत होत असल्याचे वाडा तालुक्यातील चांबळे येथील शेतकरी नरेश पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com