Bogus Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Seed : बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा

Kharif Season Planning : पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

Team Agrowon

Latur News : पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. एक मे रोजी लातूर येथे झालेल्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करण्यात काय कार्यवाही केली, याची माहितीही त्यांनी या वेळी घेतली.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते. सध्या मॉन्सूनपूर्व पाऊस होत असला तरी शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात ऐंशी ते शंभर मिलिमीटर पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नये, या बाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.

सोयाबीन पेरणीसाठी घरचे सुस्थितीतील, पावसात न भिजलेले बियाणे वापरावे आणि त्याची उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिल्या.

तसेच रुंद सरी व वरंबा (बीबीएफ) किंवा टोकण पद्धतीने पेरणी केल्यास उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ शक्य असल्याने याविषयी जनजागृतीवर भर द्यावा. शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत, असे पालकमंत्री म्हणाले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: निमखेडी येथे शेतकऱ्यांचे ‘रास्ता रोको’

Jaltara Project: बार्शीत ‘जलतारा प्रकल्प’ प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात

Shaktipeeth Highway Project: अंगावर गोळ्या झेलू, पण ‘शक्तिपीठ’ होऊ देणार नाही

Maize Varieties: एल निनोच्या परिस्थितीशी सामना करु शकणारे मक्याचे वाण

Farmer Issues: सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT