Kharif Season Varieties: खरिपात शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका पिकाला पसंती देतात. परंतु यंदाच्या एल निनोच्या परिस्थितीमुळे आपल्याला कमी पाण्यात पिकांचे नियोजन करायचे आहे. त्यामुळे मका पिकाचे कमी कालावधीचे वाण निवडल्यास पिकावर कमी पाण्याचा परिणाम कमी होतो आणि उत्पादन टिकून राहण्यास मदत होते..मक्याचे पीक हे साधारणत: ३ ते ४ महिन्यांचे असते. अति कमी कालावधीचे पीक केवळ ७० ते ८० दिवसात येते. लवकर पिकणारे वाण ८० ते ९० दिवसात येते. तर मध्यम कालावधीचे वाण ९० ते १०० दिवसात काढणीला येते. तर जास्त कालावधीचे पीक ११५ ते १२० दिवसांचे असते. कमी पावसाचा अंदाज दिल्यावर पावसाचा खंड पडण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत कमी आणि मध्यम कालावधीचे पीक तग धरु शकते. .Kharif Crop Planning: खरिपात पाऊस कमी? योग्य नियोजनाने शाश्वत उत्पादन शक्य.लवकर आणि अति लवकर पक्व होणारे मका वाण८० ते ९० दिवसांत तयार होणाऱ्या लवकर पक्व आणि ७० ते ८० दिवसांत तयार होणाऱ्या अति लवकर पक्व मका वाणांमध्ये पुसा संकर मका-१, विवेक संकरित मका-२१, विवेक संकरित मका-२७, महाराजा आणि फुले चॅम्पियन या वाणांचा समावेश होतो. पुसा संकर मका-१ या वाणाचा दाणा नारंगी पिवळा असून हा वाण खरीप हंगामासाठी योग्य आहे. त्याचे उत्पादन हेक्टरी ४० ते ५० क्विंटल मिळते. .विवेक संकरित मका-२१ आणि विवेक संकरित मका-२७ या वाणांचे दाणे पिवळ्या रंगाचे आणि अर्ध खळीदार प्रकारातील असून त्यांचे उत्पादन अनुक्रमे ४५ ते ५० आणि ५० ते ५५ क्विंटल मिळते.महाराजा या वाणाचा दाणा नारंगी रंगाचा असून उत्पादन क्षमता ६० ते ६५ क्विंटल आहे.फुले चॅम्पियन हे वाण महात्मा फुले कृषि विद्यापीठाने कमी कालावधीसाठी तयार केले आहे..Low Fertilizer Farming: कमी खतांमध्ये चांगले उत्पादन कसे घेता येते?.मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण९० ते १०० दिवसांत तयार होणाऱ्या मध्यम कालावधीच्या वाणांमध्ये राजर्षी, बायो-९६३७ आणि फुले महर्षी या वाणांचा समावेश होतो.राजर्षी या वाणाचा दाणा नारंगी पिवळा असून तो करपा रोग आणि खोडकिडीस प्रतिकारक आहे. हा वाण खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामासाठी योग्य असून खरीपात ७० ते ७५ दिवसांत तर रब्बीत ९५ ते १०० दिवसांत तयार होतो..बायो-९६३७ या वाणाचा दाणा नारंगी रंगाचा असून उत्पादन ७० ते ७५ क्विंटल मिळते.फुले महर्षी या वाणाचा दाणा नारंगी पिवळा आणि अर्ध खळीदार प्रकारातील असून हा वाण खरीप हंगामासाठी योग्य आहे. त्याचे उत्पादन हेक्टरी ७५ ते ८० क्विंटल मिळते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.