Kharif Season: राज्यात ३९५ भरारी पथके

Fertilizer Monitoring: खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व कीटकनाशके मिळावीत यासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यभरात ३९५ भरारी पथके कार्यरत झाली असून नियंत्रण कक्षाची वेळही वाढवण्यात आली आहे.
Kharif Season 2025
Kharif Season 2025 Agrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके व बियाण्यांचा गुणवत्तापूर्ण पुरवठा होण्याकरिता खरिपात गुणनियंत्रणासाठी राज्यात ३९५ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच कृषी आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाची वेळ वाढवून आता सकाळी सहा वाजेपासून रात्री आठवाजेपर्यंत करण्यात आली आहे. ो

निविष्ठा पुरवठा व गुणनियंत्रणाच्या तयारीचा अलीकडेच कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी आयुक्तालयाचा नियंत्रण कक्ष सकाळी लवकर उघडावा, अशा सूचना सचिवांनी केल्या आहेत. त्यानंतर निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर यांनीही आढावा घेतला.

Kharif Season 2025
Kharif Season 2025: आढावा झाला आता लागा कामाला

नियंत्रण कक्षाचे नियोजन, खरीप हंगामात निविष्ठा व गुणनियंत्रण कामकाज, भरारी पथकाची तयारी याबाबत संचालकांनी सूचना दिल्या. निविष्ठांची साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांना नियंत्रण कक्षाकडे तक्रार करता येईल. तसेच निविष्ठाविषयक अडचण व्हॉट्‍सॲपद्वारे देखील कळवावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी किंवा लिंकिंगबाबत शेतकऱ्यांची अडवणूक होत असते. अनेक वेळा स्थानिक पातळीवर गुणनियंत्रण अधिकारी आणि निविष्ठा संबंधित मंडळींचे लागेबांधे असतात. त्यामुळे तक्रार नेमकी कुठे करायची असा मुद्दा शेतकऱ्यांसमोर उद्‍भवतो. यामुळे नियंत्रण कक्ष उपयुक्त उपयुक्त ठरतो. राज्यभरातील तक्रारींची एकत्रित दखल घेणाऱ्या या कक्षाचे काम सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहणार आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यासाठी विविध कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती कक्षात करण्यात आली आहे.

Kharif Season 2025
Kharif Season 2025: खरिपासाठी विविध प्रकारचे बियाणे उपलब्ध

...अशी नोंदवा तक्रार

निविष्ठाविषयक गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंग याबाबत तक्रार साध्या कागदावर लिहावी.

तक्रारीत शेतकऱ्याने नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, समस्या नमूद करावी.

तक्रार लिहिलेल्या कागदाचे छायाचित्र काढून ते आयुक्तालयाकडे व्हॉट्‍सॲपद्वारे ९८२२४४६६५५ या क्रमांकावर पाठवावे.

तक्रार नोंदविण्यासाठी

व्हॉट्‍सॲपद्वारे तक्रार देण्यासाठी ः ९८२२४४६६५५

टोल फ्री क्रमांकावर तक्रार देण्यासाठी ः १८००२३३४०००

ई-मेलद्वारे तक्रार देण्यासाठी ः controlroom.qc.maharashtra@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com