Agriculture Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Subsidy : खाद्य तेल अभियानाअंतर्गत गोदाम, तेल काढणी युनिटसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Processing Industry : शेतकरी उत्पादक कंपन्या आणि संबंधित कंपन्यांसाठी गळितधान्य खाद्य तेल अभियानाअंतर्गत गोदाम सुविधा व तेल काढणी युनिट स्थापनेसाठी अनुदानाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Team Agrowon

Akola News : शेतकरी उत्पादक कंपन्या आणि संबंधित कंपन्यांसाठी गळितधान्य खाद्य तेल अभियानाअंतर्गत गोदाम सुविधा व तेल काढणी युनिट स्थापनेसाठी अनुदानाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या योजनेसाठी इच्छुकांनी जुलै अखेरपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले. या योजनेत सहभाग घेऊन लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

गोदाम सुविधा अन्नधान्याचे नुकसान टाळण्यासाठी व मूल्यवर्धनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना २५० टन क्षमतेचे गोदाम बांधण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेत प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल १२.५० लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाईल.

अर्जदारांनी ग्रामीण भंडारण योजना किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेकडून कर्ज मंजुरीनंतर अर्जदार अनुदानासाठी पात्र ठरेल. जिल्ह्यासाठी निर्धारित संख्येपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या मान्यतेनुसार सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

तेल काढणी युनिट (१० टन क्षमतेचे)

राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळितधान्य) २०२५-२६ अंतर्गत तेलबियांवर प्रक्रिया करणारे युनिट स्थापनेसाठी शासकीय/खासगी उद्योग, शेतकरी उत्पादक संघ व सहकारी संस्थांना आर्थिक मदत दिली जात आहे. यामध्ये १० टन क्षमतेचे तेल काढणी युनिट, यंत्रसामग्री, उपकरणे यांचा समावेश आहे.

यासाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल ९.९० लाखांपर्यंतचे अनुदान उपलब्ध आहे. ही योजनादेखील बँक कर्ज मंजुरीशी संबंधित असून, कर्ज मिळाल्यानंतरच लाभ मिळणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, उद्योजक व सहकारी संस्था यांनी तेलबिया प्रक्रियेतील क्षमता वाढवून उत्पन्नात वाढ साधावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

Sugarcane FRP: सोलापूर जिल्ह्यात थकली ६४२ कोटींची एफआरपी

Shekru Sighting: वाईत दुर्मिळ शेकरूचे दर्शन

Onion Seed Production: कांद्याच्या बीजोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Union Budget 2026: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT