Vineyard Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm Vineyard Damage : गारपीटग्रस्त द्राक्षबागांवर चालविली कुऱ्हाड

Grape Orchard Destroyed : लाखो रुपयांचा खर्च अन् नैसर्गिक आपत्तींच्या मालिकेमुळे वैतागलेल्या निफाड तालुक्यातील सोनेवाडी खुर्द येथील द्राक्ष उत्पादक बाळासाहेब सानप यांनी ६ एकर बागेवर कुऱ्हाड चालविली आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : लाखो रुपयांचा खर्च अन् नैसर्गिक आपत्तींच्या मालिकेमुळे वैतागलेल्या निफाड तालुक्यातील सोनेवाडी खुर्द येथील द्राक्ष उत्पादक बाळासाहेब सानप यांनी ६ एकर बागेवर कुऱ्हाड चालविली आहे. ४० ते ५० लाखांचे नुकसान होऊन आता हातात काहीच नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबर रोजी निफाड तालुक्यात द्राक्षबागांचे गारपिटीच्या तडाख्यात अतोनात नुकसान झाले. गारांचा मार लागून अक्षरशः द्राक्ष बागांमध्ये वेलीवर पाने सुद्धा राहिली नाहीत. तयार झालेली काडी मोडली. घड तुटून पडले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा यंदाचा हंगाम वाया गेल्यात जमा आहे.

सानप यांनी २०१४ साली थॉमसन व सुधाकर सिडलेस वाणाची प्रत्येकी ३ अशी ६ एकर लागवड केली होती. द्राक्षबाग उभारणीसाठी २५ लाखांचे कर्ज काढले होते. मात्र लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही निसर्गाच्या लहरीपणा अन्‌ बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे तोटा वाढत चालला.

गेल्या १० वर्षांत फयान वादळ, गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, नोटबंदी त्यानंतर कोरोनामुळे शेतकरी कोलमडून गेला. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून बागा जगविल्या. त्यासाठी कधी बँक कर्ज, पदरमोड तर सावकारी कर्ज घेऊन शेती करण्याची वेळ आली.

आजवर घेतलेले कर्ज फेडले; मात्र आता हातात काहीच नसल्याने कठोर अंतःकरणाने सानप यांनी बागेवर कुऱ्हाड चालविली. गारपिटीमुळे बागेत पाने व कोवळ्या घडांचा सडा पडला. त्यामुळे द्राक्षवेली रोगग्रस्त झाल्या आहेत. माझ्यासह अनेक शेतकऱ्यांची कर्जे थकली आहेत, असे सानप यांनी सांगितले.

‘१५ मिनिटांत होत्याचं नव्हतं

‘‘गारपिटीचा तडाखा बसल्याने अनेक बागांतील द्राक्षांचा खुडा होण्याआधीच नुकसान गंभीर आहे. यामुळे अनेक बागायतदार वैतागून द्राक्षबाग तोडण्यावर भर देत आहेत. अशी भयानक गारपीट कधी पाहिली नव्हती. १५ मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. कोरोनानंतर द्राक्ष उत्पादक सावरले असतानाच गारपिटीने घात केला. त्यामुळे लासलगावच्या पूर्व भागातील काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बागा तोडल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT