Hailstorm Crop Damage : गारपिटीने पिंपळगावलेंडी शिवारातील द्राक्ष बाग उद्ध्वस्त

Crop Damage : सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाले आहे.
Vineyard Crop Damage
Vineyard Crop Damage Agrowon

Buldana News : सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. २६ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजेनंतर झालेल्या तुफान गारपीट, पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ही बाग उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्याचे सुमारे १२ ते १५ लाखांचे नुकसान झाले आहे. पिंपळगाव-लेंडी येथील मधुकर विक्रम गायके यांची ही द्राक्ष बाग होती.

विशेष म्हणजे या भागात सुमारे ३० मिनिटे जोरदार गारांचा पाऊस झाला. जमिनीवर गारांचा थर साचला होता. किनगाव राजा परिसरात २६ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा ८६.३ मिमी पावसाची नोंद झाली. पिंपळगाव-लेंडी शिवारात नागपूर-संभाजीनगर हायवेला लागून असलेल्या गट नं. १९८ मध्ये मधुकर गायके यांनी २०१८ मध्ये एक हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागेची लागवड केली होती. २०२० मध्ये पहिले उत्पन्न जवळपास साडेचार लाख रुपये आले.

Vineyard Crop Damage
Crop Damage : पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

२०२१ मध्ये उत्पादन ११ लाख ५० हजारांपर्यंत उत्पन्न मिळाले. २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे बाग धरला नाही. मात्र, एक वर्षाच्या अंतरानंतर या हंगामात बाग बहरला व मणी अवस्थेत द्राक्षे पोहोचली होती. एक-एक द्राक्ष घड किमान दीड ते दोन किलोपर्यंत बनेल अशी शक्यता होती. त्यामुळे या वर्षी सुमारे १४ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते.

Vineyard Crop Damage
Crop Damage : पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मधुकर गायके यांनी ही बाग उभी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर बॅंकांचे जवळपास २० लाख रुपयांचे कर्ज काढलेले आहे. ते भरणार कसे, असा प्रश्न आहे. शासनाने गायके यांच्या बागेचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई पोटी अनुदान देण्याची मागणी केली जात आहे.

सिंदखेडराजा भागात खासदार, आमदार, माजी आमदार, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी, राजकीय पुढारी नुकसान झालेल्या पिकांची घटनास्थळी जाऊन पाहणी करीत असताना मधुकर गायके यांच्या शेताकडे एकाने ढुंकूनही पाहले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कोणीही अद्याप माझ्या बागेला भेट दिली नाही. बागेसाठी मी अनेक बँकेकडून कर्ज घेतलेले आहे ते कसे फेडायचे हा प्रश्न उभा राहला.
- मधुकर विक्रम गायके, द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव -लेंडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com