Hailstorm Crop Damage : पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी

Crop Damage : रब्बीची कामे सुरू झाली असतानाच वादळी वाऱ्यासह गारपिटीने दाणादाण उडविली आहे. निफाड व चांदवड तालुक्यात द्राक्ष व कांदा पिकांची दैना झाली.
Grape Hailstrom
Grape HailstromAgrowon
Published on
Updated on

Nashik News : एकीकडे खरीप हंगामात वेळेवर पाऊस न झाल्याने पिके कशीबशी हाती आली. काही ठिकाणी पेरण्या झाल्या नव्हत्या. आता खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना व रब्बीची कामे सुरू झाली असतानाच वादळी वाऱ्यासह गारपिटीने दाणादाण उडविली आहे. निफाड व चांदवड तालुक्यात द्राक्ष व कांदा पिकांची दैना झाली.

एका रात्रीत कोट्यवधी रुपयांचा उत्पादन खर्च मातीमोल झाल्याचे चित्र आहे. गारपिटीच्या तडाख्यात द्राक्षासारखे संवेदनशील पीक सापडले आहे. तर कांदा पीक व रोपे हातातून गेली आहेत. याशिवाय भात, मका, सोयाबीन व चारा भिजून शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी पडले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २७) सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यात नांदगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. तालुक्यातील वेहेळगाव महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. तर निफाड, चांदवड तालुक्यात गारपिटीचा फटका बसला.

Grape Hailstrom
Hailstrom Crop Damage : द्राक्ष, रब्बी पिकांना गारपिटीचा तडाखा

जिल्ह्यात जवळपास ७० महसूल मंडलांत जोरदार पाऊस झाला. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात ८९० गावे बाधित झाली असून ३२,८०० हेक्टर क्षेत्रावर नुकसान असून ६७,८०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ज्यामध्ये द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांचे सर्वाधिक नुकसान आहे. तर भात, मका व सोयाबीन पीक पावसात भिजले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान निफाड तालुक्यात ९,२९४ हेक्टर क्षेत्रावर आहे. त्यांनतर नुकसान चांदवड तालुक्यात आहे. यामध्ये द्राक्षपट्टा उद्ध्वस्त झाल्याची भीषण स्थिती आहे. वेलीला ना पाने राहिली ना घड असे वेदनादायी चित्र आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

Grape Hailstrom
Paddy Crop Damage : जुन्नरच्या आदिवासी भागात पावसाने भाताचे नुकसान

चांदवड, नांदगाव व निफाडमध्ये कांदा पिकाचे मोठे नुकसान आहे. अगोदरच दुष्काळसदृश परिस्थिती असताना उभी केलेले पीक काढणीसाठी आले असताना पावसाने हातात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. तर भात पट्ट्यात झालेल्या पावसामुळे कापणी केलेला भात पाण्यावर तरंगत असल्याचे वेदनादायक परिस्थिती आहे.

भाजीपाला पिकात टोमॅटो, फ्लॉवर, मिरची, कोबी यासह वेलवर्गीय पिकात कारले, गिलके दोडके व भोपळा पिकाचे मोठे नुकसान आहे. मात्र मालेगाव, देवळा तालुक्यातील नुकसान नसल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक नुकसान अहवालात नमूद करण्यात आले.

द्राक्ष बागांचे उरले फक्त सांगाडे

गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे सर्वाधिक नुकसान आहे. वार्षिक पीक भक्ष्यस्थानी सापडल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या पाच वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती व बाजारपेठेचा सामना करणारा द्राक्ष उत्पादक हतबल झाला आहे. २०० कोटी रुपयांचा उत्पादनखर्च मातीमोल झाल्याची परिस्थिती आहे. यामुळे मोठी आर्थिक कोंडी होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

नुकसानीची प्राथमिक स्थिती

तालुका बाधित गावे बाधित शेतकरी संख्या बाधित क्षेत्र(हेक्टर)

सटाणा ७६ ६९७ ५७०

नांदगाव ८८ ६,३४२ ३,२५३

कळवण ११८ ३,९०५ ७७३.४२

दिंडोरी ९८ ३,४४० २९६४.४०

सुरगाणा ७१ ७४० २२५.४०

नाशिक ८९ १,८९६ ८६८

त्र्यंबकेश्वर १८ ५५१ २२८.१०

पेठ ६४ ४,८९० ५५६

इगतपुरी १२२ ११,१२१ ५,९२०.३०

निफाड १०२ १३,८३२ ९,२९४

सिन्नर ९ ७८ ३७.६०

चांदवड ३० १९,४७० ७,५७७

येवला ५ ९०४ ५६५.२०

पिकाचे नुकसान असे

पीक क्षेत्र(हेक्टर)

मका १६९

सोयाबीन १८

भात ६७२९

जिरायती भाजीपाला ४८८.२०

कांदा १०४०८.४२

कांदा रोपवाटिका ४६७.५०

गहू ५७८

टोमॅटो ३१०.१०

ऊस २२१

बागायती भाजीपाला १,७९५

द्राक्ष ११,५९७

सीताफळ १२

डाळिंब ३४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com