Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीची ३६,७२६ हेक्टरवर लागवड

Paddy Plantation : यंदा ५१ हजार हेक्टरवर खरिपातील लागवडीचे लक्ष्य निश्चित केले होते. आतापर्यंत ३६ हजार ७२६ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पडलेल्या अनियमित पावसाचा फटका भातशेतीला बसला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत सुरू झालेल्या आषाढ सरींनी बळीराजाच्या कामांना पुन्हा वेग आलेला आहे.

यंदा ५१ हजार हेक्टरवर खरिपातील लागवडीचे लक्ष्य निश्चित केले होते. आतापर्यंत ३६ हजार ७२६ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. तुलनेत ७६ टक्केच लागवड झाली असून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्यांना बिघडलेल्या वेळापत्रकाचा त्रास सहन करावा लागत आहे.

मे महिन्यात पाऊस पडल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा जोर कमी झाला होता. परिणामी जिल्ह्यातील भाताच्या पेरण्या विलंबाने झाल्या. पुढे पावसाने पाच ते सहा दिवस विश्रांती घेतल्यामुळे लावणीत अडथळा आला होता.

त्याचबरोबर रोपांची व्यवस्थित वाढ झाली नसल्याने संगमेश्वरसह आजूबाजूच्या तालुक्यातील काही भागांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. जूनच्या अखेरीस पावसाने जोर धरला होता. त्या कालावधीत काही शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या रोपांची लागवड करून घेतली होती. जुलैतही पावसाचा जोर संमिश्र होता.

पावसाच्या पाण्यावर उपलब्ध आणि कातळ परिसरात पेरणी करण्यात आलेल्या भागात पुनर्लागवड रखडली. आतापर्यंत ५१ हजार हेक्टरपैकी ३६ हजार २६ हेक्टरवरील पुनर्लागवड पूर्ण झाली आहे. १४ हजार हेक्टरवरील लागवड शिल्लक आहे. पावसामुळेकाही दिवसात भात लागवड पूर्ण होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला जात आहे.

भात लागवडीचे क्षेत्र असे

तालुका लागवड (हेक्टरी)

* रत्नागिरी ५९४०

* लांजा २३६८

* राजापूर ५१३२

* संगमेश्वर ५९२०

* गुहागर २२३८

* चिपळूण ६१३४

* खेड ४९५५

* दापोली २२००

* मंडणगड १८५९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT