Paddy Farming : वाड्यातील भातपीक शेती दिवसेंदिवस खर्चिक

Labor Shortage : एका शेतमजुराला दररोज ४५० ते ५०० रुपये द्यावे लागत आहे. यामुळे शेती हा खर्चिक व्यवसाय होऊ लागल्याने ती परवडेनाशी झाली आहे.
Paddy Farming
Paddy Farming Agrowon
Published on
Updated on

Palghar News : जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने सर्वच तालुक्यात भात लावणीला वेग आला आहे. परंतु, वाडा येथे मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यात मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. एका शेतमजुराला दररोज ४५० ते ५०० रुपये द्यावे लागत आहे. यामुळे शेती हा खर्चिक व्यवसाय होऊ लागल्याने ती परवडेनाशी झाली आहे.

जिल्ह्यात पावसाने आगमन केल्यानंतर तालुक्यातील गाव-पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे, मात्र एकाच वेळी सर्व तालुक्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाल्याने वाडा येथे मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर आणावे लागतात.

Paddy Farming
Paddy Farming : सुधारित तंत्राने वाढवले भाताचे उत्पादन

त्यात मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. एका शेतमजुराला दररोज ४५० ते ५०० रुपये सकाळी न्याहरी, दुपारी जेवण द्यावे लागते. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडा तालुक्यात एकेकाळी मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या होती, पण १९९५ पासून या तालुक्यात उद्योगधंदे आल्यामुळे येथील मजूर उद्योगधंद्यात कामाला लागले आहेत.

Paddy Farming
Paddy Farming: पुणे जिल्ह्यात पश्चिम भागात भात रोपे टाकण्याची कामे रखडली

शिवाय बांधकामासाठी शहरात व नदी खाडीकिनारी वर्षभर रेती काढण्यासाठी शेकडो मजूर जात असल्याने मजुरांची टंचाई जाणवते.भातशेतीसाठी पावसाळ्यात मिळणारे मजूर गेल्या अनेक वर्षांपासून मिळत नसल्याने भातपिकाची लागवड करायची कशी, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.

भातलावणी यंत्रे महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना परवडत नाहीत. त्यामुळे येथील भातशेती संकटात सापडली आहे. तालुक्यात १७६ गावे २०९ हून अधिक पाडे असून, १५ हजार हेक्टर क्षेत्र भातपिकाखाली आहे. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. येथे झिनी (वाडा कोलम), सुरती, सुवर्णा, जोरदार, वाय.एस.आर, रत्ना, जया आदी वाणांची लागवड केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com