Pune District Rain: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मॉन्सूनने पुणे जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले असून, जिल्ह्यातील सुमारे दहा तालुक्यांत मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद मंडलात सर्वाधिक १३५ मिलिमीटर पाऊस झाला. तर बारामती आणि इंदापूर तालुक्यांत केवळ तुरळक सरी पडल्या..मॉन्सूनची वाटचाल सुरुवातीला वेगाने सुरू होती. मात्र, कोल्हापूर परिसरापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची प्रगती काही दिवस रखडली होती. आता मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने पुणे जिल्ह्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू असून काही भागांत जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे..Ahmednagar Rain Update: जूनअखेरही पावसाची प्रतीक्षा; अहिल्यानगरला ‘यलो अलर्ट’.मंगळवारी (ता. २३) दुपारनंतर पुणे शहर आणि उपनगरांमध्येही रिमझिम पावसाने हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला. सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू असताना दुपारी अचानक हवामानात बदल झाला आणि पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्या. बालेवाडी, हडपसर, चिंचवड, एनडीए परिसर तसेच हवेली तालुक्यातील विविध भागांत पावसाची नोंद झाली..Heavy Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी.भात पट्ट्यातील शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत होते. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. धुळवाफेत पेरणी झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस पावसाने दडी मारल्यामुळे बियाण्यांच्या उगवणीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. भात पिकाव्यतिरिक्त इतर पावसाळी पिकांचे पर्याय मर्यादित असल्याने दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले होते. मात्र, आता सुरू झालेल्या पावसामुळे भात पट्ट्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे..जिल्ह्यातील पश्चिम व घाटमाथ्यावरील तालुक्यांत पावसाचा अधिक प्रभाव दिसून आला असून, खरीप हंगामाच्या दृष्टीने ही समाधानकारक सुरुवात मानली जात आहे..पुणे जिल्ह्यात बुधवार (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंतझालेला मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये)जुन्नर : वडगाव आनंद १३५, नारायणगाव १२६, ओतूर ६९, वडज ५८, ओझर ४८, राजूर ४२, आपटाळे ४२, मढ ४२.मावळ : लोणावळा ११४, कुसगाव ११४, काळे ४९, खडकाळा ४९, शिवणे ४९.वेल्हा : वेल्हा ९६, पाणशेत ६३.आंबेगाव : आंबेगाव ७३, कळंब ७०, घोडेगाव ५६, मंचर ५२, निरगुडसर ५२.मुळशी : माले ६३, मुठे ६३, पोमगाव ६३, कोळवण ५९, माण ४९.भोर : भोलावडे ५५, आंबवडे ४३, निगुडघर ४३, भोर ३९.खेड : वाडा ३५, वेतोळे २९, आळंदी २६, चाकण २४.हवेली : उरुळीकांचन ३३, खेडशिवापूर २९, भोसरी २६, कळस २६, चिंचवड २४.शिरूर : शिरूर २१, तळेगाव १९, रांजणगाव १७.दौंड : बोरीभडक २१, खामगाव १८, वडगावबांडे १७.पुरंदर : राजेवाडी २१, कुंभारवळण १८, परिंचे १८..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.