Paddy Farming : डहाणूतील बळीराजाला आवणीचे वेध

Paddy Plantation : पालघर जिल्ह्यात जूनमध्येच भाताच्या बी-बियाण्यांची पेरणी केल्यामुळे आणि पाऊस नियमितपणे सुरू झाल्याने चांगली उगवण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon
Published on
Updated on

Palghar News : पालघर जिल्ह्यात जूनमध्येच भाताच्या बी-बियाण्यांची पेरणी केल्यामुळे आणि पाऊस नियमितपणे सुरू झाल्याने चांगली उगवण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजाला आता आवणीचे वेध सुरू झाले आहेत. भाताची रोपे ही २० ते २५ दिवसांची झाली आहेत.

जिल्ह्याच्या काही भागात पारंपरिक पद्धतीने भातलावणी करण्यास सुरुवात झाली आहे. लावणीसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी लावणीला सुरुवात करावी, असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

Paddy Farming
Paddy Snail Attack : भात पिकाला शंखी गोगलगायींचा धोका

हळव्या जातीसाठी २० ते २३ दिवस, निमगरव्या जातीसाठी २५ दिवस व गरव्या जाती २५ ते ३० दिवसांनी लावणी करावी. एका चुडात फक्त तीन ते चार रोपे लावावीत. रोपांची तिरपी व खोल लावणी केल्याने फुटवा कमी येण्याची शक्यता असते.

सर्वसाधारणपणे हळव्या जातीसाठी १५ बार १५ सेंमी अंतरावर, निमगरव्या आणि गरव्या जातीसाठी २० बाय १५ सेमी अंतरावर लावणी करावी, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. पावसाचे सातत्य असल्याने भातशेती चांगलीच बहरली आहे.

Paddy Farming
Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

खतांचे नियोजन

हेक्‍टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश अशी खतांची शिफारस आहे. हळव्या जाती-हळव्या जातीमध्ये लावणीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले ५० टक्के नत्र

लावणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.

गरव्या आणि निमगरव्या जातीसाठी लावणीच्या वेळी ४० टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. लावणीनंतर २५ ते ३० दिवसांनी ४० टक्के नत्र आणि २० टक्के नत्र लावणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

संकरित जातींकरिता लावणीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले २५ टक्के नत्र लावणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.

सध्या भात रोपांची वाढ चांगली आणि सशक्त आहेत. भातलावणीसाठी पाऊस पोषक असल्याने सुरुवातीच्या काळात ७० ते ८० दिवसांत तयार होणाऱ्या हळव्या जातीची लावणी व त्यानंतर ११० ते १२० दिवसांत तयार होणाऱ्या गरव्या जातीच्या भाताची लावणी करण्यात येणार आहे.
- संजय पाटील, प्रगतिशील शेतकरी, डहाणू
भात रोपवाटिकेतून रोप काढल्यानंतर लगेच ते क्लोरोपायरीफॉस (डार्सबन)च्या द्रावणात बुडवून घ्यावे. त्यानंतर पीएसबीच्या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावे, जेणेकरून भातपिकाला किडीपासून सरंक्षण होतेच आणि रोपाच्या मुळावर पीएसबीमुळे फायदा होतो. रोप लवकर जीव धरते.
- अनिल नरगुलवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com