Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : तरारलेल्या पिकांच्या कोळपणीला वेग

Kharif Sowing : कोळपणीच्या या कामात फक्त शेतकरीच नाही, तर संपूर्ण कुटुंब सहभागी झाले असून, मजुरांची वाट न पाहता घरातील सर्वच सदस्य कोळपणीमध्ये सहभागी झाले आहेत.

Team Agrowon

Solapur News : बार्शी तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी व परिसरात यावर्षी मे महिन्याच्या मध्यावरच दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगाम वेळेपूर्वीच सुरू झाला. या वेळेआधी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर अशा पिकांची पेरणी साधारणपणे एक महिना आधीच पूर्ण केली.

त्यामुळे आज घडीला सोयाबीन पिके चांगल्या वाढीच्या अवस्थेत असून, शेतकरी कोळपणीसाठी बैलजोडींचा उपयोग करत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या शेतांमध्ये पारंपरिक पद्धतीने बैलजोडींच्या साहाय्याने कोळपणी करण्याचे काम सुरू आहे. कोळपणीच्या या कामात फक्त शेतकरीच नाही, तर संपूर्ण कुटुंब सहभागी झाले असून, मजुरांची वाट न पाहता घरातील सर्वच सदस्य कोळपणीमध्ये सहभागी झाले आहेत.

एका बैलजोडीवर तीन कोळपी लावून मोठ्या क्षेत्रात कोळपणी सुरू आहे. यामध्ये विशेषतः महिला वर्गाचाही सक्रिय सहभाग दिसून येतो. या लवकर पावसामुळे नदी, नाले, तलाव भरून वाहू लागले आणि पेरणीस योग्य वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी योग्य संधी साधत ट्रॅक्टर व काहींनी पारंपरिक बैलजोडींच्या साह्याने पेरण्या पूर्ण केल्या.

पेरणीनंतर नियमितपणे होणाऱ्या अधूनमधून पावसामुळे पिकांची वाढ जोमात होत असताना जवळपास वीस दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. तणनाशक व कीटकनाशकांच्या फवारणी ब्रेक लागला होता. मंगळवारी (ता.१) दुपारनंतर हलक्याशा सरी झाल्याने पिकांना पोषक स्थिती निर्माण झाली होते.

मात्र दिवसभर पावसाच्या सरी झाल्या नाहीत.सध्या सोयाबीन पिकांमध्ये तणांचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकरी तणनाशक फवारणी करत आहेत. तसेच काही भागांत अळीचा प्रादुर्भावही दिसून येत असल्याने कीटकनाशक फवारणीकडेही शेतकरी लक्ष देत आहेत. पांगरी भागात कांदा लागवडीमध्ये वाढ होताना दिसत आहे. शेतकरी कांद्याच्या बियाणे टाकून रोप तयार करू लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT