Market Bulletin: सोयाबीन टिकूनदेशातील बाजारात सोयाबीनचे भाव कायम आहेत. सध्या बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु असले तरी सरासरी भावात फारशी घट दिसली नाही. देशातही सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहे. सोयाबीनला बाजारात सध्या ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयापेंड आणि सोयातेलाचे भाव टिकून असल्यामुळे सोयाबीनच्या भावालाही आधार आहे. सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापूस स्थिरआंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात कालपासून काहीसे चढ उतार दिसत आहे. कापूस यंदाच्या उचांकी भावापासून नरमलेला आहे. पण ७७ सेंट प्रतिपाऊंडच्या आसपास कापूस कालपासून विकला जात आहे. कच्चा तेलाच्या भावात जसे बदल दिसत आहे तसे कापसाच्या भावतही चढ उतार दिसत आहेत. याचा परिणा देशातील बाजारावरही दिसत आहे. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून दरात काहीसे चढ उतार दिसत आहेत. देशातील बाजारात कापूस सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ७०० ते ९ हजारांच्या दरम्यान विकला जात आहे. कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Indian Raisin Industry: बेदाणा उद्योग संरक्षणासाठी कठोर धोरणाची मागणी.जांभळाला मागणीबाजारात जांभळाची आवक सुरु झाली आहे. राज्यातील काही बाजारांमध्ये दाखल झालेल्या जांभळाची आवक कमीच आहे. कमी प्रमाणात आवक असल्याने जांभळाला भाव चांगला मिळत आहे. नुकतीच सुरुवात असल्याने जांभळाची चव चाखण्यासाठी मागणीही आहे. सध्या जांभूळ बाजारात गुणवत्तेप्रमाणे १२ हजार ते २७ हजारांच्या दरम्यान विकले जात आहे. मुंबई आणि पुणे मार्केटला जांभळाला २२ हजार आणि २७ हजारांचा भाव मिळाला. तर इतर बाजारांमधील भाव १२ हजार ते १७ हजारांच्या दरम्यान राहीला. बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दरपातळी काहीशी स्थिरावलेली दिसू शकते, असा अंदाज जांभूळ बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..India US Trade: भारत करणार ५०० अब्ज डॉलरची अमेरिकन वस्तू खरेदी: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो.तुरीची आवक कमीचदेशातील बाजारात तुरीचा भाव मागील काही दिवसांपासून हमीभावाच्या आसपास पोचला आहे. पण दरपातळी या दरम्यान स्थिरावलेली दिसत आहे. तूर उत्पादक पट्ट्यातील बाजारांमध्ये आजही तुरीची आवक चांगली दिसत आहे. तर तुरीचा भाव यामुळे दबावात दिसत आहे. सध्या तूर बाजारात ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. तुरीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याचा अंदाज आहे. तर यंदा एल निनोच्या पार्श्वभुमीवर तुरीची लागवडही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या भावात सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ज्वारी आवक सुधारलीराज्यातील अनेक बाजारात ज्वारीची आवक सुधारली आहे. तर ज्वारीला मिळणारा उठाव स्थिर आहे. त्यामुळे ज्वारीचे भावही काही बाजारांमध्ये स्थिरावले आहेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचे पीक चांगले आल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा दबाव बाजारावर आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. ज्वारीची बाजारातील आवक काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीचा भावही स्थिरावू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.