
Jalana News : यंदा जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत पाच लाख ३२ हजार ७७३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.
असून, आतापर्यंतचा पेरणी टक्का ८२ टक्के एवढा राहिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, जालना, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद या आठ तालुक्यांत खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र सहा लाख ५१ हजार १७४ हेक्टर आहे.
असे असताना आतापर्यंत पाच लाख ३२ हजार ७७३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. जुलैअखेरपर्यंत सर्वच पिकांचे क्षेत्र वाढणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सोयाबीनच्या सरासरी क्षेत्रात एक लाख ८१ हजार ५७५ असताना आता वाढ होऊन एक लाख ८२ हजार ७१८ एवढे झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक खरीप पेरणी जालना तालुक्यात झाली असून, ९३.८२ टक्के पेरणी झाली आहे. भोकरदन तालुक्यामध्ये सर्वात कमी ७० टक्के पेरणी झाली आहे.
तालुकानिहाय आतापर्यंत झालेली पेरणी
भोकरदन ७१ हजार ६५९ हेक्टर
जाफराबाद ५१ हजार ७१७ हेक्टर
जालना ८६ हजार ५८३ हेक्टर
अंबड ७४ हजार १७५ हेक्टर
परतूर ५५ हजार १३८ हेक्टर
बदनापूर ५३ हजार २९५ हेक्टर
घनसावंगी ८१ हजार ५०७ हेक्टर
मंठा ५८ हजार ६९९ हेक्टर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.