Khandesh Farming: खानदेशात यंदा रब्बी अथवा उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात काहीशी वाढ झाली असली, तरी उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी आले आहे. सुमारे ३ हजार हेक्टरवर पेरणी झालेल्या उन्हाळी सोयाबीनचे सरासरी उत्पादन एकरी केवळ २ ते अडीच क्विंटल नोंदविले जात आहे..एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे २ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. बियाण्यांचा खर्च कमी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी घरगुती प्रक्रिया केलेले बियाणे वापरले. विशेषतः काळ्या कसदार जमिनीत या पिकाची पेरणी अधिक प्रमाणात झाली..Massive Seed Production: ग्रामबीजोत्पादनातून २९ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध.बाजारात उन्हाळी हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता मर्यादित होती. काही खासगी कंपन्यांनी बियाणे पुरवठ्याचे नियोजन केले. काही भागात आगाऊ पेरणीही करण्यात आली. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत उन्हाळी सोयाबीनची पेरणी तुलनेने कमी असून तेथे शेतकरी कृत्रिम जलसाठ्याच्या आधारावर सोयाबीनऐवजी भुईमुगाला अधिक पसंती देतात..Summer Soybean: उन्हाळ सोयाबीन पेरणी कमी.थंडीचा कालावधी वाढल्यास उत्पादन घटेल, अशी भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही अनेकांनी चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. जळगाव जिल्ह्यात डिसेंबरपासूनच उन्हाळी सोयाबीनची पेरणी सुरू झाली होती. मागील महिन्यात बहुतांश ठिकाणी मळणी पूर्ण झाली आहे. कमी कालावधीत तयार होणाऱ्या वाणांना यंदा अधिक पसंती मिळाली..पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने अनेक शेतकऱ्यांनी तुषार सिंचन आणि ठिबकच्या माध्यमातून सिंचन व्यवस्थापन केले. त्यामुळे इतर पिकांसाठीही पाणी उपलब्ध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला..काळ्या कसदार जमिनीत वाढले क्षेत्रगिरणा, तापी आणि वाघूर नदी परिसरातील काळ्या कसदार जमिनीत उन्हाळी सोयाबीनची लागवड अधिक झाली. जळगाव जिल्ह्यात रावेर भागात क्षेत्र कमी असले, तरी यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, जळगाव आणि अमळनेर भागात पिकाचे क्षेत्र वाढले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि तळोदा भागातही काही प्रमाणात लागवड झाली. अनेक शेतकऱ्यांनी घरातील बियाण्यांची उगवणक्षमता तपासून बीजप्रक्रिया करून पेरणी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.