Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam: ‘उजनी’तून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद

Bhima River: उजनी धरणाकडे दौंड येथून येणारी पाण्याची आवक कमी झाल्याने भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

Team Agrowon

Solapur News: उजनी धरणाकडे दौंड येथून येणारी पाण्याची आवक कमी झाल्याने भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, उजनी धरण सध्या ९४.६५ टक्क्यांपर्यंत भरले असून, जवळपास ११४ टीएमसी इतका पाणीसाठा धरणात आहे.

उणे पातळीत असलेले उजनी धरण २७ मे रोजी अधिक पातळीमध्ये आले. धरण व्यवस्थापनाच्या नियोजनानुसार जुलैअखेर उजनीत ९४ टक्के पाणीसाठा अपेक्षित आहे. त्यानुसार सध्या उजनी धरणात ९४ टक्के पाणीसाठा झाला असून.

सध्या दौंडकडून ४५०० क्युसेक इतकी आवक धरणात होत असून, धरणातून पुढे भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग मात्र बंद करण्यात आला आहे. सध्या केवळ कालवा, सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजना व विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी पाणी सोडले जात आहे.

मुसळधार पावसाचा जवळपास ४० ते ५० दिवसांपासून खंड पडल्याने २६ मेपर्यंत उणे पातळीत उजनीतून भीमा नदीत सोडलेला विसर्ग सध्या पूर्णतः बंद करण्यात आला आहे. सध्या धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पास १६०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून १८० क्युसेक दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ८० क्युसेक, बोगद्यातून ८०० क्युसेक 

आणि कालव्यातून २१०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दौंड येथून पाण्याची आवक सुरू असल्याने कालव्यातून पाणी सुरूच राहणार आहे. पावसाळा संपायला आणखी दोन महिने शिल्लक असल्याने उजनीतून पाणी सोडले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दौंडकडून येणारा संपूर्ण विसर्ग उजनीत साठविल्यास धरण अवघ्या आठ-दहा दिवसांत १०० टक्के भरेल, असेही अधिकारी म्हणाले. २१ जून रोजी धरणाच्या कालव्यातून ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. तेव्हापासून कालव्याद्वारे पाणी सुरू असून सध्या २१०० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT