
Nashik News : सटाणा शहरासह तालुक्यातील आरम खोऱ्यातील पाणीपुरवठ्यासाठी वरदान ठरणारे केळझर (ता.बागलाण) येथील गोपाळसागर धरण यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असून आरम नदीपात्रात पूरपाणी सोडले आहे.
२०१३ नंतर तब्बल १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या लवकर धरण भरले आहे. धरण भरल्याने आरम खोऱ्यातील पाणीपुरवठा योजनांना मदत होणार असल्याने आता पाणीटंचाईचे संकट टळले आहे. बागलाण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसामुळे केळझर येथील गोपाळसागर धरण १०० टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यावरून आरम नदीपात्रात पूरपाणी सोडले आहे.
५७२ दशलक्ष घनफूट क्षमतेचे हे धरण आरम खोऱ्यातील २५ ते ३० गावांचा शेतीसिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवते. धरणातून डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात येते. त्यामुळे कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आरम, हत्ती व कान्हेरी नदीपात्रात पाणी आल्याने सटाणा शहरासह आरम नदीकिनारी असलेल्या डांगसौंदाणे, निकवेल, कंधाणे, चौंधाणे, मुंजवाड, जोरण, तळवाडे दिगर, किकवारी, वटार, मोरकुरे, भावनगर, करंजखेड, साकोडा, बुंधाटे, कंधाणे, दहिंदूले, चौंधाणे, मळगाव आदि गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा उद्भव चार्ज झाल्याने तालुक्यातील टंचाईस्थिती दूर होण्यास मदत होणार आहे. २९ जुलै २०१३ ला गोपाळसागर धरण जुलैच्या पहिल्या आठवड्यात भरले होते. त्यानंतर प्रथमच यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरण भरल्याची नोंद झाली आहे.
रब्बीची सोय
रब्बी हंगामात आरम नदीपात्रात दोन ते तीन आवर्तने दिली जातात, तसेच उन्हाळ्यात मे महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले जाते. यामुळे नदीकाठावरील पाणी योजनांना चालना मिळते.
गेल्या महिनाभरापासून धरण क्षेत्रात संततधार सुरू आहे. मे महिन्यातच सुरू झालेल्या पावसामुळे नद्या-नाले प्रवाही झाले असून, धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेगाने ओघ सुरू आहे.
त्यामुळे धरण वेळेत भरल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. पुढील काळात पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास आरम नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.