Aditi Tatkare Agrowon
ॲग्रो विशेष

Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविकांच्या उर्वरित मागण्यांबाबत दोन दिवसांत निर्णय

Aditi Tatkare : ‘अंगणवाडी सेविकांच्या काही मागण्या यापूर्वीच मान्य केल्या आहेत. उर्वरित प्रमुख मागण्यांबाबत मुंबईत बैठक घेऊन दोन दिवसांत निर्णय घेऊ’, असे आश्वासन आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

Team Agrowon

Kolhapur News : ‘अंगणवाडी सेविकांच्या काही मागण्या यापूर्वीच मान्य केल्या आहेत. उर्वरित प्रमुख मागण्यांबाबत मुंबईत बैठक घेऊन दोन दिवसांत निर्णय घेऊ’, असे आश्वासन महिला व बालकल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

दरम्यान, संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मंत्री तटकरे यांना तिळगूळ देऊन अंगणवाडी सेविकांचा सण गोड करण्याची विनंती केली. सरकारी वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, तोपर्यंत अंगणवाडी सेविकांना किमान वेतन कायद्यानुसार २६ हजार रुपये वेतन व मदतनीसांना २० हजार रुपये वेतन द्यावे,

या प्रमुख मागण्यांसह वेतनकाळातील वेतन कपात करू नये, नूतन अंगणवाडी सेविकांना दिलेल्या नोटिसा रद्द कराव्यात या व इतर मागण्या या वेळी करण्यात आल्या. मंत्री तटकरे म्हणाल्या, की राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात येणार होते, मात्र त्या संपावर असल्याने देता आले नाहीत.

शिवाय त्यांच्या विमा संरक्षणातील प्रलंबित विषयही मार्गी लावले आहेत. ग्रॅच्युअटी व पेन्शनसंदर्भात देखील अंगणवाडी सेविकांच्या कृती समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. दिवाळीची भाऊबीजदेखील पंधरा दिवस आधीच अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा केली होती.

महिला व बाल कल्याण विभागाच्या अखत्यारित जेवढे विषय आहेत ते मार्गी लावले आहेत. वेतनवाढीचा प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्यासोबत चर्चेने सोडवायचा आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईत बैठक घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. त्याबरोबरच अंगणवाडी सेविकांना दिलेल्या नोटिसाही रद्द करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

अतुल दिघे, अप्पा पाटील, सतीश कांबळे, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील, शुभांगी पाटील, दिलदार मुजावर, उत्कर्ष पवार, सरिता कारंडे, सविता पवार, मीनाक्षी काशीद, सुनीता जाधव आदी उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Coconut Conclave: नारळ - काजूची लागवड वाढवा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, 'ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे गोव्यात प्रकाशन

Rabi Season : परभणी जिल्ह्यात ४ हजार ४४५ क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्ष्यांक

Nanded Rainfall : सरासरी १३९.०६ टक्के पावसाची नोंद

Paddy Harvesting : भात कापणीसाठी लगबग सुरू

Farmer Loan Waiver: संपूर्ण कर्जमाफी, ५० हजार एकरी मदतीसाठी शेतकरी आणि शेतमजूरांचे राज्यभर आंदोलन

SCROLL FOR NEXT