Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन

For Various Demands of Anganwadi Servants : अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावार राज्यभरातील अंगणवाडी सेविका एकवटत राज्य सरकारविरोधात एल्गार केला.
Anganwadi Sevika
Anganwadi SevikaAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावार राज्यभरातील अंगणवाडी सेविका एकवटत राज्य सरकारविरोधात एल्गार केला. या महोमार्चासमोर शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. ‘‘राज्य सरकारमध्ये संवेदना शिल्लक असेल तर सरकार पडण्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लावावा,’’ असे आव्हान त्यांनी दिले.

राज्यभरातून आलेल्या अंगणवाडी सेविकांमुळे छत्रपती शिवाजी टर्मिनससह आझाद मैदान बुधवारी (ता.३) परिसर फुलला होता. मागील वर्षी केलेली वाढ ही अत्यल्प होती. ती वाढवून दरमहा २६ आणि मदतनिसांना २२ हजार रुपये मानधन मिळावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. कमलाताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली सेविका व मदतनिसांनी मोर्चा काढला.

Anganwadi Sevika
Anganwadi Sevika Salary : अंगणवाडी सेविका मानधनावरून महाजन-ठाकूर यांच्यात खडाजंगी

ठाकरे म्हणाले, की सरकारला जाहिरातींवर उधळायला पैसे आहेत पण अंगणवाडी सेविकांना द्यायला पैसे नाहीत. तुमच्यासोबत नेता म्हणून नव्हे तर भाऊ म्हणून आलो आहे. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी तुम्ही आंदोलन करीत आहात. ही क्रांतीची ज्योत मशाल होऊन सत्तेला चूड लावेल.

Anganwadi Sevika
Anganwadi Sevika Strike : अंगणवाडी सेविका संपामुळे बालके आहारापासून वंचित

मंगळवारी (ता.२) आंदोलक नेते मला निमंत्रण द्यायला आले होते. मात्र, मी मुख्यमंत्री असताना तुमच्यासाठी काही करू शकलो नाही. कारण, कोविडचे संकट होते. त्या काळात तुम्ही घराघरात जाऊन लोकांची सेवा केली. त्यामुळेच मी देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये होतो.

तुम्ही डिसेंबरपासून आंदोलन करत आहात. तरीही सरकार ऐकत नाही. प्रत्येक अधिवेशनात पुढील अधिवेशनात करू, असे आश्वासन दिले जाते. पण तोवर तुम्ही टिकाल का, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला.

‘सेल्फी काढून पोट भरणार का?’

रेल्वे स्थानकांवर लावण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या सेल्फी पॉइंटवरून खिल्ली उडवत ठाकरे म्हणाले, ‘‘एका सेल्फी पॉइंटसाठी साडेसहा लाख रुपये दिले जात आहेत. तुमचे चोचले पुरवले जात असतील तर हक्काचे पैसे का दिले जात नाहीत? सेल्फी काढून पोट भरणार आहे का, आम्ही तुमच्या नेतृत्वात फूट पाडणार नाही.

आम्हाला हक्काने बोलवा. सरकारमध्ये जरा संवेदना असेल तर हे सरकार पडायच्या आत तुमच्या मागण्या मान्य करतील. नाहीतर आमचे सरकार तुम्ही आणणारच आहात. तुमचा निर्णय प्रथम करू,’’ असे आश्वासन त्यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com